Next
‘ओन्ली एचआर’च्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, December 18, 2018 | 04:15 PM
15 0 0
Share this article:

डॉ. अनिल अवचटडॉ. आनंद नाडकर्णीपुणे : ‘कॉर्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ओन्ली एचआर’ संस्थेचा पाचवा वर्धापनदिन २७ डिसेंबर २०१८ रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांना मार्गदर्शन करणार आहेत’, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक यांनी दिली.

‘हा कार्यक्रम घोले रस्ता येथील नेहरू सभागृहात सायंकाळी सात वाजता होणार आहे. पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांचा मान्यवरांच्या हस्ते ‘एचआर प्रोफेशनल अॅवॉर्ड’ देऊन सत्कार केला जाणार आहे. ‘संतांचे मानसशास्त्र’ या विषयावर डॉ. नाडकर्णी हे व्याख्यान देणार आहेत,’ असे संस्थेचे सचिव प्रशांत इथापे आणि खजिनदार जितेंद्र पेंडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
२७ डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : नेहरू सभागृह, घोले रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay Gandhi About 278 Days ago
A important and most needed initiative for HR to understand their career, new opportunities, remain updated with latest trends like industry 4.0, networking amongst them , a pat on their shoulder and accolades, appreciation, opportunities in HR , a big think tank behind them and overall support, inspiration in what they are doing. A series of lectures to educate themselves is a right move.
1
0

Select Language
Share Link
 
Search