Next
कझाकस्तानमधील स्पर्धेसाठी ‘स्टारफिश’च्या जलतरणपटूंची निवड
BOI
Tuesday, March 19, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

कझाकस्तानमधील स्पर्धेसाठी निवड झालेल्या जलतरणपटूंसह मान्यवर

ठाणे : कझाकस्तान येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाण्यातील ‘स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन’च्या जलतरणपटूंची निवड झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या ‘मॉडर्न पेंटथलॉन नॅशनल बायथल अ‍ँड ट्रायथल चॅम्पियनशीप’ स्पर्धेत या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करून आशियाई स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. 

पुण्यात झालेल्या स्पर्धेत आयुषी आखाडे हिने सुवर्णपदक पटकावले, तर विराट ठक्कर, मिहीका सुर्वे, नील वैद्य यांनी रौप्यपदक मिळवले. यश भोसले, फ्रेया शहा यांनी चौथा, राज उपेटवाला याने पाचवा, आरुष सुर्वे याने सहावा क्रमांक प्राप्त केला. या सर्व जलतरणपटूंची कझाकस्तान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, सध्या हे सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनखाली सराव करत आहेत. या सर्व जलतरणपटूंना महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search