Next
‘डीकेटीई’चे विद्यार्थी घेणार चीनमध्ये उच्च शिक्षण
दोन वर्षांच्या कालखंडासाठी २५ लाखांची शिष्यवृत्ती मिळणार
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 11:50 AM
15 0 0
Share this article:

चीनमधील उहान विद्यापीठात निवड झालेल्या विद्यार्थ्यासह संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ यू. जे. पाटील व मार्गदर्शक प्राध्यापक.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’मधील टेक्स्टाइलचे शिक्षण घेतलेल्या चार विद्यार्थ्यांची चीनमधील उहान विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी २५ लाख रुपये शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे. 

चीनमधील उहान विद्यापीठात वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत शिक्षण दिले जात असून, या विद्यापीठातर्फे आशिया खंडातून मोजक्याच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड केली जाते. उहान विद्यापीठ व ‘डीकेटीई’मध्ये असलेल्या सामंजस्य करारामुळे ‘डीकेटीई’तील विद्यार्थ्यांना चीनला जाऊन पदव्युत्तर शिक्षण शिष्यवृत्तीसह पूर्ण करता येणार आहे. जगभरात होत असलेले बदल व तंत्रज्ञाननाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश होणे महत्त्वाचे आहे हे ओळखून ‘डीकेटीई’ने २१हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे ‘डीकेटीई’तील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह परदेशात जाण्याचे स्वप्न साकार करीत आहेत.

याकराराअंतर्गत ‘डीकेटीई’तील बीटेक्स्ट टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीचे सम्मेद पाटील, बीटेक्स्ट मॅन मेड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीचे कुलदीप चव्हाण, बीटेक्स्ट टेक्स्टाइल केमिस्ट्रीचे पवन कुमार व बीटेक्स्ट फॅशन टेक्नॉलॉजीची श्‍वेता मोरे या चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.    

या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर ७० विद्यार्थ्यांमधून या चार विद्यार्थ्यांची ऑनलाइन इंटरव्ह्यूसाठी निवड केली गेली. या इंटरव्ह्यूमधून त्यांच्या टेक्निकल कौशल्य, संशोधनाबद्दलचे ज्ञान आणि रिसर्च प्रपोजल याची सविस्तर पडताळणी करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना त्यांच्या दोन वर्षांच्या या पदव्युत्तर शिक्षणादरम्यान टेक्स्टाइलच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांना संशोधन करता येणार आहे.  

‘सध्याच्या डिजिटल युगात परदेशात शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण घेण्याचे आमचे स्वप्न साकारत होत आहे, हे केवळ ‘डीकेटीई’च्या असलेल्या सामंजस्य करारामुळे. गेल्या पाच  वर्षांत अनेक विद्यार्थ्यांना परदेशात अशी संधी उपलब्ध करून देणारी ‘डीकेटीई’ ही आघाडीची संस्था आहे,’ असे बीटेक्स्ट फॅशन टेक्नॉलॉजीच्या श्‍वेता मोरे हिने सांगितले. 

या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. व्ही. बी. ढंगे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी शुभेच्छा दिल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search