Next
वेसाव्याची होळी दर वर्षीप्रमाणेच उत्साहात
BOI
Saturday, March 23, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:




मुंबई : मुंबईतील वर्सोवा अर्थात वेसावा हे पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्यांचे गाव. या वेसाव्याची होळी दर वर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी केली गेली. येथील कोळणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. दर वर्षीप्रमाणे बाजार गल्ली आणि मांडवी गल्ली अशा दोन ठिकाणांहून रात्री १० वाजता मिरवणुका निघाल्या. साजशृंगार केलेल्या कोळणी त्यात सहभागी झाल्या होत्या. दोन्ही मिरवणुकांमध्ये नाखवा म्हणजे पुरुष मंडळी आणि छोटी मुलेही विविध पोशाखात सहभागी झाली होती. या मोठ्या मिरवणुका पाहण्यास नागरिकांची गर्दीही खूप झाली होती. होळीची पूजा झाल्यावर होळीपुढे नाच झाल्यावर होळी पेटवली गेली. या मिरवणुकांची छायाचित्रकार श्रीकांत मलुष्टे यांनी टिपलेली क्षणचित्रे सोबत दिली आहेत.

सर्व छायाचित्रे : श्रीकांत मलुष्टे




 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search