Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, October 15, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this article:औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीनल सासणे, मंगला पाटील, कविता सुरवसे, सुधाकर वानखेडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे, डॉ. विलास आढाव उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना सासणे म्हणाल्या, ‘पवार कुटुंबामध्ये स्त्री-पुरुष समानतेची बीजे लहानपणापासून रुजल्यामुळे आम्ही मुली असून घराबाहेर पडू शकतो; तसेच समाजात ताठ मानेने वावरू शकलो. महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा-तेव्हा त्या आपले कर्तृत्व सिद्ध करतात.’डॉ. लोखंडे म्हणाले, ‘आई ही आई असते. प्रत्येक आईला आपला मुलगा मुलगी मोठा व्हावे असे वाटते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. म्हणून आज ‘रयत’च्या वटवृक्षाच्या छायेत अनेक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या घरच्यांनी घराबाहेर काढले. तेव्हा त्यांना फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनी आश्रय दिला. त्यामुळे पुढे सवित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना करून सर्व जाती-धर्मातील स्त्रियांसाठी तिळगुळ समारंभाचा कार्यक्रम घेतला व सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.’

‘सावित्रीबाई फुले यांनी पस्तीस स्त्रियांची बाळंतपणे केली. काशीबाईंचा मुलगा यशवंत याला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. त्यामुळे एक स्त्री म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. आई मुलगा-मुलगी असा भेद करत नाही. कारण  मातृत्व हे फक्त स्त्रीलाच (आईलाच) येऊ शकते. त्यामुळे एक कवी आपल्या कवितेत म्हणतो ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाली आई’,’ असे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.

डॉ. आढाव म्हणाले, ‘साने गुरुजींनी जगाला ‘श्यामची आई’  दिली; परंतु समाजात स्त्रियांचे स्थान अजूनही दुय्यम स्वरूपाचे आहे. स्त्रियांच्या सामाजिक परिवर्तनाची लढाई १९व्या शतकामध्ये सुरू झालेली दिसते. सावित्रीबाई फुले,  ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक यांनी या परिवर्तनाला सुरुवात केली. जागतिकरणा सर्व विश्व ‘लोकल ते ग्लोबल’ झाले आहे. त्यामुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. आईने मुलांशी संवाद करणे गरजेचे आहे. अलीकडचे मुले स्वतःच्या भावविश्वात (मोबाइल, इंटरनेटमध्ये) रममाण झालेले दिसतात. त्यामुळे आईने मुलांशी संवाद करणे गरजेचे आहे.’‘कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त हा उपक्रम घेतला असून, आईला कॉलेजमध्ये यायला मिळावे. चर्चेमध्ये सहभागी होता यावे; तसेच आपली मुले-मुली कोठे शिक्षण घेतात, हे पाहता यावे.  मुलांचा पहिला गुरु आई असते, तर दुसरा गुरु शिक्षक असतो. त्यामुळे आई-विद्यार्थी-शिक्षक त्यांच्यामध्ये सुसंवाद घडून यावा. यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम महाविद्यालयांमध्ये घेण्यात आला.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. संजय नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियदर्शनी पारकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. एस. साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. सविता पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. शशी कराळे, प्रा. किरण कुंभार, प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी, प्रा. सायली गोसावी, प्रा. आसावरी शेवाळे, डॉ. अतुल चौरे यांसह विद्यार्थ्यांच्या आई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
म्रुदुला कर्णी About 184 Days ago
अतिशय स्तुत्य उपक्रम.आईला मुलीच्या काँलेजात यायला मिळण हे खूप महत्वाच .कारण समाजाच्या ज्या स्तरातून आपल्याकडे विद्यार्थिनी येतात ते बघता त्यांच्या मातांना अश्या कार्यक्रमाची गरज आहे .डाँ आंबेडकर महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन
1
0

Select Language
Share Link
 
Search