Next
‘महिला ‘सीएं’नी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटावे’
BOI
Tuesday, August 21, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this story

सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिल्पाताई पटवर्धन. डावीकडून सीए श्रीरंग वैद्य, डॉ. किशोर सुखटणकर, सीए कला निंबरे, सीए अँथनी राजशेखर.

रत्नागिरी :
‘सीए इन्स्टिट्यूटने देशासाठी भरीव योगदान केले आहे. आता रत्नागिरीत परीक्षा केंद्र झाल्यामुळे अनेकांना सीए होण्याची संधी मिळत आहे. यशाला शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी मेहनत करावीच लागते. येथील अनेक युवती सीए होऊ लागल्या आहेत. या स्त्री शक्तीने समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी झटावे,’ असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे अध्यक्ष सीए श्रीरंग वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला सक्षमीकरणाच्या हेतूने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जीएसटीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर शाखाध्यक्ष सीए श्रीरंग वैद्य, उपाध्यक्ष सीए अँथनी राजशेखर, जिल्ह्यातील पहिल्या महिला सीए कला निंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. सीए श्रीरंग वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ‘सीए इन्स्टिट्यूटला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, जीएसटी कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,’ असे त्यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. 

नूतन सीए यशश्री चौधरी हिचा सत्कार करताना शिल्पाताई पटवर्धन.

‘सर्व प्रश्न सरकारने सोडवले पाहिजेत, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु या साऱ्यामध्ये माझी भूमिका काय आहे याबाबत नागरिक विचार करत नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर देशाचा नागरिक म्हणून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नसुद्धा नागरिकांनी केला पाहिजे. ‘सीएं’मुळे सरकारच्या तिजोरीत जास्तीत जास्त कर जमा होत असतो. कर भरतात त्यांच्याकडून सीए पैसे घेत असतात. परंतु सरकारनेही ‘सीएं’ची दखल घेतली पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि गुणवंतांना पाठबळ द्यावे, याकरिता सरकारदरबारी विनंती करणार आहे,’ असे शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या.

नूतन सीए संकेत पाटणकरचा सत्कार करताना शिल्पाताई पटवर्धन.

‘आताचे जग हे कौशल्यावर आधारित उद्योग-व्यवसायांचे आहे. त्यामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे अभ्यासक्रम सुरू करून त्यासाठी एक तासिका वाढवली आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेने सर्वसामान्य नागरिक, महिलांना करविषयक माहिती देण्याकरितासाठी शिबिरे आयोजित करावीत,’ असे आवाहनही त्यांनी केले.

पाच दिवसांच्या जीएसटी कार्यशाळेत महिला सक्षमीकरण समितीच्या सदस्य सीए अभिलाषा मुळ्ये, सीए मीनल काळे, सीए शमिका सरपोतदार, सीए अमृता बेर्डे, सीए मोनाली कुलकर्णी, सीए दीपाली पाध्ये, सीए स्वाती ढोले, सीए समृद्धी पाटणकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

जीएसटी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थिनीचा सत्कार करताना सीए श्रीरंग वैद्य.

कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थिनींना व्यासपीठावरील मान्यवर आणि शाखेचे सेक्रेटरी सीए बिपिन शहा, सीए खजिनदार अभिजित चव्हाण, सदस्य सीए हृषिकेश फडके यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सीए आनंद पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित स्पर्धेतील विजेता चैतन्य वैद्य याला पारितोषिक देताना डॉ. किशोर सुखटणकर.

विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील विजेत्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात आले. प्रश्नमंजूषा स्पर्धेत चैतन्य वैद्य व अमेय वझे या जोडीने विजेतेपद पटकावले. सिद्धेश झगडे व मृणाली पवार, मयुरी भुवड व नयन सुर्वे, प्रणोती कबाडे व अमृता भट या सहभागींनाही प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत अमेय वझे याने प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वैद्य याला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

नूतन सीए आयेशा अघाडी हिचा सत्कार करताना शिल्पाताई पटवर्धन.

नवोदित ‘सीएं’चा गौरव
सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेल्या वर्षी सुरू झाली. यंदा प्रथमच सर्व परीक्षांसाठी रत्नागिरीत केंद्र सुरू झाले. यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबईत जाण्याचा सर्वच विद्यार्थ्यांचा त्रास वाचला. याचा फायदा नव्याने सीए झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाला. रत्नागिरीतून या वर्षी नऊ विद्यार्थी सीए उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात आला.

सीए इन्स्टिट्यूटतर्फे नूतन सीए अनुप शहाच्या वतीने वडील सीए बिपिन शहा यांनी शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.

सीए यशश्री चौधरी, सीए आयेशा अघाडी, सीए संकेत पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. सीए अनुप शहा याच्या वतीने वडील सीए बिपीन शहा यांनी सत्कार स्वीकारला. कुणाल पटेल, रवींद्र पाभरणकर, शीतल सुराणा, अमेय वझे, पवन लांडगे हेदेखील नूतन सीए असून, कार्यक्रमाला काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. सत्कारानंतर यशश्री चौधरी, आयेशा अघाडी, संकेत पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘इन्स्टिट्यूटची शाखा व परीक्षा केंद्रामुळे यश मिळण्याचे प्रमाण वाढले आणि यापुढे कोकणातील विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होऊन ‘सीएं’ची संख्या नक्कीच वाढेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सीए झालेल्या दोन युवकांच्या ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट 
भाजीविक्रेत्या आशाबाईंचा मुलगा झाला सीए
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link