Next
फोकल पॉईंट
BOI
Monday, November 06 | 11:11 AM
15 0 0
Share this story

वेळ, पैसा, उत्पादकता आणि कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. व्यक्तिगत व्यवस्थापनाच्या जगभरातील सर्वोत्तम कल्पना आणि योजनांचे एकत्रीकरण त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे.

व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात असामान्य कामगिरी बजावलेल्या स्त्री-पुरुषांच्या सवयी या पुस्तकातून समजतात. कोणतेही काम करताना यश मिळवायचे असेल, तर आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायला हवा. उत्पादकता दुपटीने वाढवायला हवी, धोरणात्मक नियोजन करायला हवे, असे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत.

व्यवसाय आणि करिअर, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन, आर्थिक स्वातंत्र्य या महत्त्वाच्या विषयांवरही ते बोलतात. आरोग्य, आत्मशांती या मुद्द्यांकडेही लक्ष वेधतात.

प्रकाशक :
मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : २०८
किंमत : १७५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link