Next
अपोलो म्युनिकतर्फे क्रांतीकारी विमा योजना सादर
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 06:36 PM
15 0 0
Share this story

नवीन योजनेची माहिती देताना अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्सचे पश्चिम क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर खरबंदा, प्रॉडकट विकास विभागाचे कार्यकारी संचालक श्रीकांथ कंदीकोंडा आणि उपाध्यक्ष अवी प्रतापसिंग
पुणे : अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स (एएमएचआय) कंपनीने ‘हेल्थ वॉलेट’ ही क्रांतिकारी व परस्पर-फायद्याची आरोग्य विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विनशुअर ही नवी श्रेणीही सादर केली आहे.पैशाचे पुरेपूर मूल्य, सोपेपणा व उत्तम सेवा अशी सर्व वैशिष्ट्ये असणारी ही योजना आरोग्य विमा क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी सज्ज आहे. 

हेल्थ वॉलेट पॉलिसी ग्राहकांना नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये न दिला जाणारा हॉस्पिटल वास्तव्याचा आणि बाह्य रुग्ण विभागाचा (ओपीडी) खर्च देतेच, परंतु नंतरच्या वर्षांमध्ये पॉलिसी सुरु ठेवताना ती ग्राहकांसाठी किफायती ठरेल, याचीही खात्री देते. यामध्ये चाकोरी मोडणारा असा रिझर्व्ह बेनिफिट हा लाभही आहे. नावाप्रमाणेच तो ग्राहकांसाठी एक राखीव निधी तयार करतो, जो वाचा उपचार, औषध खरेदी, लसीकरण, दंतोपचार खर्च, निदान चाचण्या, चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्स, रक्तदाब अथवा साखरेवर देखरेख ठेवणारी वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिमीटर, प्रोस्थेटिक्स, वैद्यकीय व्यावसायिक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ आदींकडून सल्ला यासारख्या विविध गोष्टींवर स्वतःच्या खिशातून कराव्या लागणार्याव खर्चांसाठी वापरता येतो. एवढेच नव्हे, तर तो अन्य वैद्यकीय विम्यांतून सामान्यपणे वगळल्या जाणार्या, व ज्यांची भरपाई मिळत नाही अशा गोष्टींचाही (नॉन-पेएबल आयटम्स) खर्च देण्याची लवचिकता मिळवून देतो. याचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे इतर वैद्यकीय विम्यांमध्ये न दिल्या जाणार्याश प्रसाधनोपचार (कॉस्मेटिक ट्रिटमेंट), स्मृतिभ्रंश (अल्झायमर) अशा वैद्यकीय खर्चांची भरपाईही तो देतो. ग्राहक या राखीव रकमेचा उपयोग सह-भरणा (को-पेमेंट) व वजावट खर्चासाठीही (डिडक्टिबल कॉस्ट) करु शकतात.

रिझर्व्ह बेनिफिट या लाभाचा सर्वांत रंजक भाग म्हणजे तो तुमच्याच पैशाला तुमच्यासाठी उत्पन्न मिळवायला लावतो. प्रत्येक वर्षी वापर न झालेली रक्कम पुढे ओढून घेतली जाते व त्यावर सहा टक्के बोनस मिळतो. हा साठलेला राखीव निधी पाच सातत्यपूर्ण पुनर्नवीकरणांनंतर (रिन्युअल) पुढच्या पुनर्नवीकरण हप्त्याची ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम भरण्यासाठी वापरता येतो. आरोग्य विमा उद्योगात हा निर्विवाद असा नवा मैलाचा टप्पा आहे, जो बचत व परताव्याबाबतच्या भारतीय मानसिकतेची दखल घेऊन ग्राहकांना नंतरच्या वर्षांतील त्यांचे आरोग्य विमा हप्ते भरण्यासाठी अर्थसाह्य करतो.

यासंदर्भात बोलताना अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्सचे पश्चिम क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर खरबंदा म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीबरोबरच भारतीयांच्या आरोग्यसुरक्षाविषयक गरजाही झपाट्याने बदलत असल्याने आरोग्य विमा क्षेत्रालाही ग्राहकांच्या उभरत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी स्वतःत बदल घडवणे अनिवार्य ठरले आहे. स्वतःच्या खिशातून कराव्या लागणार्याव खर्चाच्या बाबतीत १८९ देशांच्या क्रमवारीत भारताचा १८३वा क्रमांक आहे. याचाच अर्थ आरोग्यसुरक्षा खर्चापैकी जवळपास ७० टक्के खर्च हा ग्राहकाच्या खिशाला पडणारा भुर्दंड आहे. भारतीय ग्राहक नेहमी पैशाचे पुरेपूर मूल्य शोधतात आणि पैशांची बचत करा व भविष्याचा विचार करा, हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येते. निवृत्तीनंतर आरोग्य विम्याचे हप्ते कसे भरायचे, ही काळजी लोकांच्या मनात असते. ग्राहकांच्या दृष्टीने चिंतेचे विषय असणार्याी या तीन गोष्टींमुळेच आम्ही या उद्योगाचा पुनर्शोध घेण्यास प्रवृत्त झालो’.

ते पुढे म्हणाले, ‘हेल्थ वॉलेट हे पुढच्या पिढीचे उत्पादन असून त्याची रचना आरोग्यविमा खरेदीबाबत लोकांच्या मनातील विविध गोंधळ दूर करण्यासाठी, तसेच त्यांच्या संपूर्ण आरोग्यसुरक्षा अर्थपुरवठाविषयक गरजांची पूर्तता होण्यासाठी करण्यात आली आहे. हेल्थ वॉलेट ही योजना कंपनी आणि ग्राहक या दोघांनाही लाभदायक असल्याने एक नवी परिभाषा रुढ करण्यास सज्ज आहे. ओपीडी ते रुग्णालयीन वास्तव्य ते आपत्कालीन स्थितीतील सर्व आरोग्यसुरक्षा गरजांची पूर्तता केवळ एकाच योजनेमधून केली जाणार आहेच, शिवाय तुमचा पैसाही तुमच्यासाठी उद्याच्या काळात उत्पन्न मिळवणार आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणू, यावर आमचा दृढ विश्वास आहे. आम्ही भारताला आरोग्य आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न यापुढेही सुरु ठेवणार आहोत.जे ग्राहक आपल्या आरोग्यसुरक्षा खर्चांपैकी पहिल्या काही लाख रुपयांची तरतूद वैयक्तिक निधी अथवा कंपनीच्या विमा योजनेतून करु शकत असतील, त्यांच्यासाठी हेल्थ वॉलेट योजनेत वजावटीचा पर्यायही आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link