Next
रायरेश्वर पठारावरील दुर्गम माळवाडी, धानवली होणार प्रकाशमान
‘महावितरण’चे काम पूर्णत्वाकडे; लवकरच वीजपुरवठा सुरू होणार
BOI
Thursday, April 25, 2019 | 06:34 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भोर येथील ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर वसलेल्या आणि समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ७५० फूट उंचीवर असलेल्या माळवाडी व धानवली या अत्यंत दुर्गम गावांना वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’कडून उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेचे काम पूर्ण होत असून या गावांमध्ये सुमारे १०० वीजखांब व एक रोहित्र उभारण्यात आले आहे. लवकरच या गावांचा वीजपुरवठा सुरू होणार आहे.

अतिदुर्गम व सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगल शिवाय वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसलेल्या पुणे जिल्ह्यातील माळवाडी व धानवली या गावांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. डोंगरदऱ्या व कातळकडा चढत वीजखांब व इतर विद्युत साहित्य अक्षरशः खांद्यावर वाहून नेऊन हे विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत अतिदुर्गम रायरेश्वर पठारावरील मतदान केंद्रामुळे माळवाडी व धानवली गावे नुकतीच चर्चेत आली होती. ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांनी या गावांच्या विद्युतीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या वीजयंत्रणेचा आढावा घेतला व ही दोन्ही गावे लवकरच प्रकाशमान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

भोरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. खोल दऱ्या, दाट झाडी, उंच सुळके व आडवळणांचा घाट अशा अत्यंत दुर्गम व ११ किलोमीटर अखंड असलेल्या रायरेश्वर पठारावर रायरी ग्रामपंचायतीअंतर्गत माळवाडी हे १० घरांचे गाव वसलेले आहे. त्यापुढे अडीच किलोमीटरवर धानवली हे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले ३५ घरांचे गाव आहे. रायरेश्वर पठारावरील माळवाडी येथे जाण्यासाठी ३०० फूट उंचीचा कातळकडा लोखंडी शिडीच्या साह्याने चढावा लागतो, तर तेथून धानवली गावात जाण्यासाठी २३५ फुटांचा कातळकडा उतरावा लागतो. अशा स्थितीत खांबांसह इतर साहित्य खांद्यावर वाहून नेण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 118 Days ago
Hope , these places soon become accessible by transport. Why Should they remain isolated
0
0

Select Language
Share Link
 
Search