Next
‘भावनिक जवळीकतेसाठी लँडस्केपिंगही महत्त्वाचे’
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 10:43 AM
15 0 0
Share this story

अभिनेते धर्मेंद्र ‘सुमन शिल्प’ या लँडस्केप, आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझायनिंग संस्थेच्या नवीन स्टुडिओचे उद्घाटन करताना. सोबत उमा आणि महेश नामपूरकर

पुणे : ‘माझ्या लोणावळ्यातील जमीनीवर तिथला निसर्ग जपत काहीतरी सुंदर उभे करावे अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी लँडस्केपिंगवरील पुस्तके जमवून माझ्या मनात झाडे, बसण्यासाठी बाकडी, नयनरम्य कारंजी असे चित्र उभे केले होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भावनिकदृष्ट्या जवळची वाटणारी ती जागा असावी असे मला वाटत असे. त्यासाठी जागेचे लँडस्केपिंग फार महत्त्वाचे असते. पुण्यातील लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांनी ते सर्व प्रत्यक्षात उतरवले,’ अशी भावना प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.        

प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांच्या ‘सुमन शिल्प’ या लँडस्केप, आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझायनिंग कंपनीच्या नवीन स्टुडिओचे अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी धर्मेंद्र बोलत होते. संस्थेच्या सहसंस्थापिका  व इंटिरिअर डिझायनर उमा नामपूरकर, सिद्धेश नामपूरकर या वेळी उपस्थित होते.  

‘मी गेली कित्येक वर्षे महेश यांचे काम जवळून पाहतो आहे. मी त्यांना माझ्या मुलासारखेच मानतो. त्यांच्याकडे रेखाटन कौशल्य उत्तम आहेच शिवाय मानवी भावना समजून घेत त्या कागदावर आणि नंतर घराच्या लँडस्केपिंगमध्ये कशा उतरवाव्यात याची त्यांना जाण आहे,’ अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी कौतुक व्यक्त केले. नामपूरकर म्हणाले, ‘धर्मेंद्रजी आजूबाजूच्या गोष्टी फार काळजीपूर्वक पाहतात. लँडस्केपिंगची त्यांना विशेष आवड असून एखाद्या जागेस सौंदर्य कसे प्रदान करता येईल याबद्दल त्यांच्या डोक्यात स्पष्ट चित्र असते. ते नेहमी मला आपल्या कल्पना सांगून माझ्याकडून लँडस्केपिंगचे आरेखन करून घेत.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link