Next
मॉरिशसमधील व्यवसाय संधींबाबत परिषदेचे आयोजन
मराठा चेंबर आणि लायन्स क्लबचा उपक्रम
BOI
Friday, January 25, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील तरुण व्यवसायिकांना मॉरिशसमध्ये व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ डी दोन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, २८ जानेवारी २०१९ रोजी एका उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘मराठा चेंबरच्या सेनापती बापट मार्गावरील आयसीसी टॉवर येथील कार्यालयात संध्याकाळी साडे पाच ते आठ या वेळेत ही परिषद होणार आहे,’ अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक प्रांत ३२३४ डी दोनचे प्रांतपाल रमेश शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘तरुण व्यावसायिकांना भारतातच नव्हे, तर जगात कुठेही व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लब नेहमी कार्यरत आहे. या चर्चासत्रात योगिदा स्वामीनादेन हे मार्गदर्शन करतील. मॉरिशसचे टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन विभागाचे मंत्री, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असांत गोविंद आणि त्यांचे मॉरिशस येथील सहकारी हे देखील या वेळी उपस्थित असतील,’ असे चर्चासत्राचे संयोजक लायन संतोष पंडित यांनी सांगितले.

‘या कार्यक्रमाला उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, प्रांतपाल अरुण शेठ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, संचालक सुधन्वा कोपर्डेकर, समन्वयक राजेंद्र गोयल, विजय सोनवणे, रवी चौधरी, शिवाजी चमकिरे, बिपिन पाटोळे, संदीप चांगेडिया, श्रीराम भालेराव, आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती लायन नंदा पंडित यांनी दिली.

‘या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी २६ जानेवारीपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत ९३७०० ५६६६५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा,’ असेही पंडित यांनी सांगितले.

कार्यक्रमविषयक :
मॉरिशसमधील व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शन 
स्थळ : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, आयसीसी टॉवर, सेनापती बापट मार्ग.
दिवस व वेळ : सोमवार, २८ जानेवारी, संध्याकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत. 

नावनोंदणीसाठी संपर्क : ९३७०० ५६६६५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link