Next
कोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार
BOI
Saturday, February 23, 2019 | 11:17 AM
15 1 0
Share this article:

श्री धरणकरीण नवीन मूर्तीची मिरवणूक काढताना ग्रामस्थ

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या नव्या मूर्तीची मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, वास्तुशांती, कलशारोहण आदींसह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच उत्साहात पार पडले. चार दिवसांच्या या कार्यक्रमांची सांगता २१ फेब्रुवारी २०१९ रोजी झाली. रत्नागिरी परिसरातील नागरिक व मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

फुलांच्या सुरेख आरासीमध्ये श्री धरणकरीण देवीची देखणी मूर्ती.जीर्णोद्धार कमिटी व पब्लिक देवस्थान ट्रस्टने चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ग्रामदेवतांना गार्‍हाणे घालून धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मंदिराची वास्तुशांती व जुन्या मूर्तीचे उत्थापन केले. दुसर्‍या दिवशी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा झाला.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य वेदमूर्ती प्रकाश भावे व सहकार्‍यांनी केले. यजमानपद सुधाकर व वरदा मोने यांनी भूषवले. गावातील ज्येष्ठ पुरोहित पांडुकाका वैद्य यांच्या हस्ते कळसाची पूजा करून कलशारोहण करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विश्‍वनाथ वझे, मंदिराचे बांधकाम करणारे दिलीप कदम, पदाधिकारी संजय साळवी, दत्ताराम भुवड, सुधाकर कोलगे, आत्माराम सहस्रबुद्धे, नितीन मोने, भाई गुरव, अरुण पेडणेकर, उपसरपंच स्वप्नील मयेकर, अशोक पाखरे, विलास परवडे, देणगीदार, मंदिर उभारणार्‍या कारागिरांचा सत्कार करण्यात आला.

आरती करताना भाविक.

मंदिर उभारणीपासून जीर्णोद्धार सोहळ्यासाठी गावकर शंकर परवडे, लावगणवाडी ग्रामस्थ, महिला मंडळाने भरपूर मेहनत घेतली. समारोपाच्या रात्री श्री सत्यनारायण उत्साही नाट्य नमन मंडळ (कुवे, मधली उगवतवाडी, लांजा) यांचे नमन पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती.

पूर्णाहुती देताना यजमान सुधाकर पुरोहित व वरदा पुरोहित. शेजारी सर्व ब्रह्मवृंद पुरोहित.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मंदार About 143 Days ago
मंदिराचा जीर्णोद्धार छान, ग्रामस्थांनी एकी दाखवून कार्यक्रम यशस्वी केला.
0
0

Select Language
Share Link
 
Search