Next
रोटरीतर्फे ‘असामान्य कार्य गौरव’ पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 12:52 PM
15 0 0
Share this story

रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य नगर यांच्या वतीने वर्षा काळे, उदय जगताप आणि तुषार जोशी यांना रवी धोत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे : ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१’चा भाग असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य नगर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी बारबाला आणि परित्यक्ता महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या वर्षा काळे आणि नक्षलग्रस्त भागात तरुणांसाठी विविध उपक्रम राबविणारे उदय जगताप यांना ‘असामान्य कार्य गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, तर जनसंपर्क क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल तुषार जोशी यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला.

डेक्कन जिमखाना येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१’चे डीजीएन रवी धोत्रे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी  रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरचे अध्यक्ष रवींद्र बोंडे, सचिव रविंद्र पाटील, खजिनदार संजीव सहस्त्रबुद्धे, नियोजित अध्यक्षा वासवी मुळे, सभासद अजय वाघ, वासू रामानुजाम, महेश घोरपडे आदी उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link