Next
‘प्रमोद महाजन हे संघटनेसाठी समर्पित कार्यकर्ता’
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 02:02 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘प्रमोदजी महाजन यांचा परिचय एक कुशल संघटक, उत्कृष्ट वक्ता, दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आहे; पण त्यांच्यात असलेला संघटनेसाठी समर्पित कार्यकर्ता समजून घेण्याचा प्रयत्न आपण साऱ्यांनी करायला हवा,’ असे प्रतिपादन प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी केले.

प्रमोद महाजन यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात ३० ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.पुराणिक म्हणाले, ‘भाजपचे वडाळ्याला असलेले कार्यालय मंत्रालयाजवळ निर्माण करण्याच्या प्रमोदजींच्या दूरदृष्टीमुळे आज भाजपचे प्रदेश कार्यालय नरीमन पॉइंटला उभे आहे. प्रमोदजींचा उत्साह आनंद देणारा होता. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन ते तातडीने सकारात्मक निर्णय घेत असत.’

अश्विन व्यास यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link