Next
हिमायतनगरमध्ये २१ ऑगस्टपासून रंगणार तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा
BOI
Monday, August 19, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक छायाचित्र

हिमायतनगर :
हिमायतनगरमध्ये २१ ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत तालुकास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिमायतनगर येथील गटशिक्षणाधिकारी श्री. संगपवार यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत ही माहिती दिली. 

या स्पर्धेत कबड्डी, तायक्वांदो, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांचे सामने रंगणार आहेत. तसेच योगासनेही केली जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये १४ ते १९ या वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्री. संगपवार आणि तालुका क्रीडा संयोजक के. बी. शन्नेवाड यांनी केले आहे.

हिमायतनगरमध्ये परमेश्वर मंगल कार्यालयासमोर, जि. प. हायस्कूल, हु. ज. पा. महाविद्यालय, बालाजी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी, तसेच मनीषा आश्रमशाळा - पोटा, कै. श्रीधरराव देशमुख शाळा सरसम, जि. प. प्रा. शाळा – बोरगडी या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search