Next
सातारा जिल्ह्यात महिलेवर यशस्वी ब्रॅकीथेरपी
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 01:00 PM
15 0 0
Share this story

सातारा : येथील ऑन्को लाइफ सेंटरमध्ये डॉ. करण चंचलानी यांनी अत्याधुनिक ब्रॅकीथेरपीचा वापर करून अवघ्या एका आठवड्यात स्तनांचा कर्करोग असलेल्या ६६ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार केले.

या ठिकाणी दाखल होण्याआधी त्यांच्या डाव्या स्तनावर ब्रेस्ट संवर्धनशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रेडिएशनसाठी ऑन्को लाइफ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या छातीत १.५ बाय १.२ बाय १ सेंटीमीटर आकाराचा छोटा ट्युमर आढळून आला. त्यांचे कक्षा गाठबिंदू निगेटिव्ह होते आणि त्यांची पॅथेलॉजिकल स्टेज पीटी१एन०(स्टेज १)ही होती. त्यांना हृदयविकार व मानसिक आजारांसारखे इतर आजारही होते. त्यामुळे स्तनांची स्थिती पाहण्यासाठी आणि योग्य निदान करण्यासाठी रेडियोथेरपीची  आवश्यकता होती.   

विस्तृत तपासणी केल्यानंतर ब्रॅकीथेरपीचा उपयोग करून अॅक्सिलरेटेड पार्शिअल ब्रेस्ट इर्रेडिएशन (एपीबीआय) करण्याचे नियोजन करण्यात आले. पारंपरिक रेडिएशन थेरपीला सहा आठवडे लागतात; मात्र या अत्याधुनिक पद्धतीला केवळ एक आठवड्याचा कालावधी लागला. ही प्रक्रिया  यशस्वी ठरली आणि उपचार पूर्ण झाल्याच्या दिवशी या महिलेला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

या विषयी बोलताना ‘ऑन्को लाइफ’चे डॉ. चंचलानी म्हणाले, ‘ब्रॅकीथेरपीमध्ये रेडियोअॅक्टिव्ह मटेरिअल थेट ट्युमरच्या आत किंवा बाजूला ठेवण्यात येते. ब्रॅकीथेरपीला इंटर्नल रेडिएशन थेरपी असेही म्हणतात. त्यामुळे फिजिशिअन एक्स्टर्नल बीम रेडिएशनच्या तुलनेत थोड्या काळात थोड्या भागावर उपचार करण्यासाठी रेडिएशनचा मोठ्या प्रमाणावरील डोस वापरू शकतो.’

‘ब्रॅकिथेरपीचे अनेक फायदे आहेत. रेडिएशन अत्यंत उच्च पातळीच्या अचूकतेने देण्यात येत असल्याने कर्करोगावर उपचार करण्यासाठी ही पद्धत खूपच परिणामकारक आहे. शरीरातून अत्यंत टारगेटेड आणि निश्चित प्रकारे रेडिओथेरपी देण्यात येत असल्याने याचे दुष्परिणाम कमी असतात. रुग्णाला इतरही आजार असल्यामुळे अधिक काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणेही शक्य नव्हते. या थेरपीमुळे रुग्णाला लाभ झाला. या उपचारांसाठी एक ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे या उपचारांनंतर दोन ते पाच दिवसांत बरे वाटू लागते,’ अशी माहिती डॉ. चंचलानी यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link