Next
‘संचेती’तर्फे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 03:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : संचेती हॉस्पिटलतर्फे जागतिक पितृदिनानिमित्त १६ जूनपासून ‘पितृदेवो भव सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमामध्ये वडील असणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांच्या आजाराबद्दल मोफत सल्ला व उपचार दिले गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून नोंदणी करून लोकांनी या उपक्रमाचा फायदा घेतला.

लोकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन संचेती हॉस्पिटलने २३ जून रोजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिर राबवण्यात येणार आहे. हे शिबिर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर येथे असणार असून, सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत आयोजित केले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचशा आजारांकडे कानाडोळा केला जातो. गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, सांधे आखडणे, संधिवात, मणक्यांचे जुने आजार, पाय सुजणे किंवा मुंग्या येणे, स्पोर्ट इंज्युरी अशा व अजूनही वेगळ्या हाडांच्या विकारांनी बाधित असण्याऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचेती हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

संचेती हॉस्पिटल गेल्या ५३ वर्षांपासून पुण्यामधील व देशविदेशातल्या अनेक रुग्णांना आरोग्य सुविधा देत असल्यामुळे आज आशिया खंडातील सर्वात मोठे हाडांचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते.

शिबिराविषयी :
दिवस
: २३ जून २०१८
वेळ : सकाळी नऊ ते दुपारी एक
स्थळ : संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे.
नावनोंदणीसाठी संपर्क : ८८८८८ ०८८३९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link