Next
रायगडावरील दुर्मीळ वनस्पतीचे ‘शिवसुमन’ असे नामकरण
पर्यावरण पंधरवड्यादरम्यान रायगड स्वच्छता उपक्रम
BOI
Thursday, June 20, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
रायगडावर सापडलेल्या ‘फ्रेरिया इंडिका’ या दुर्मीळ वनस्पतीचे ‘शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले आहे. पर्यावरण पंधरवड्यादरम्यान, शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्या वेळी ही दुर्मीळ वनस्पती आढळून आली. 

या वेळी दुर्मीळ जातीच्या या वनस्पतीची पन्नासपेक्षा अधिक रोपे रायगडावर लावण्यात आली;तसेच पर्यटकांना ऐतिहासिक वारसास्थळे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. 

बायोस्फिअर्स, पुणे महानगरपालिका, समर्थ भारत, पुणे वनविभाग, फर्ग्युसन महाविद्यालय, पर्यावरण मंच, भा. म. संघ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे केंद्र अशा विविध संस्थांच्या वतीने एक जून ते १५ जून दरम्यान पर्यावरण पंधरवडा राबवण्यात आला. 

पर्यावरण अभ्यासाला व संवर्धनाला चालना मिळावी, त्याचे शास्त्रीय विश्लेषण व्हावे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित या पर्यावरण पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पर्यावरण साक्षरता विषयावरील चर्चासत्र, आळंदी परिसर स्वच्छता अभियान, जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल वीरांचा सन्मान, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल फेरीचे आयोजन, ट्वीग मार्च आदी उपक्रमांचा समावेश होता.

 
या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी तुळशी प्राणवायू मास्क लावून, घोषणा देऊन वायू प्रदूषणाबाबत जनजागृती केली. सिग्नलला थांबलेल्या नागरिकांना या वेळी कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search