Next
रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा
BOI
Thursday, October 04, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पातळीवरील तबलावादन स्पर्धा १५ ऑक्टोबरला रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रख्यात तबलावादक फजल कुरेशी, र्‍हिदम अ‍ॅरेंजर नितीन शंकर व राकेश परिहस्त यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

रत्नागिरीतील प्रख्यात तबलावादक रोहन दिनकर सावंत याच्या आठवणीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण १६ ऑक्टोबरला होणार असून, या वेळी कुरेशी, परिहस्त यांची जुगलबंदी होणार आहेत. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध तबलावादक, तबला अभ्यासक्रमाचे प्रमुख, लेखक, आमोद दंडगे व ढोलकीवादक कृष्णा मुसळे करणार आहेत.

स्पर्धा सोलो तबलावादन प्रकारची असून, ती आठ ते १४ वर्षे आणि १५ ते २० वर्षे या वयोगटात होईल. लहान गटासाठी पाच मिनिटे, तर मोठ्या गटासाठी १० मिनिटांचा अवधी दिला जाईल. लेहरासाथीची सोय केली जाईल; तसेच  साथीदार हवे असल्यास त्यांना स्वखर्चाने आणायचे आहे.

स्पर्धेत हातांची तयारी, सादरीकरणाची पद्धत, वादनातील विविधता या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. एकाच तालामध्ये सादरीकरण करावे. दोन्ही गटांतील विजेत्यांना पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेची नावनोंदणी १० ऑक्टोबरपर्यंत करायची आहे. कणकवली, सिंधुदुर्ग येथील स्पर्धकांनी प्रसाद करंबेळकर यांच्याशी संपर्क साधावा.

रोहन सावंतरोहन सावंत हा पंचमदांचे र्‍हिदम अ‍ॅरेंजर दिवंगत मारुतीराव कीर यांचा नातू असून, तो शालेय जीवनापासून मुंबईत प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये शिकण्यास जात होता. ही संधी त्याला पालकांमुळे मिळाली. कोकणात असे अनेक कलाकार आहेत; मात्र ते मुंबईत मोठ्या अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. ही संधी येथील नवोदित कलाकारांना मिळावी, यासाठी रोहनच्या नावाने अकादमी काढण्याचा विचार सावंत कुटुंबीय व रोहनचे गुरू, सहकलाकारांनी केला आहे. यामध्ये मुंबईतील नामवंत कलाकार प्रशिक्षण देण्यासाठी येतील. यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क :
विजय रानडे (संगीत शिक्षक, रत्नागिरी) - ९४२२३ ७६२२२.
राजा केळकर (केळकर उपाहारगृह, रत्नागिरी) - ९४२३० ४७३४७.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search