Next
‘एफजीआयआय’च्या कर्मचाऱ्यांची ‘श्रीवत्स’ला भेट
प्रेस रिलीज
Monday, June 11, 2018 | 03:48 PM
15 0 0
Share this story

पुणे : फ्यूचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या (एफजीआयआय) कर्मचाऱ्यांनी ‘श्रीवत्स’ या सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटलतर्फे  (एसओएफओएसएच) चालविण्यात येणाऱ्या स्पेशल चाइल्ड केअर सेंटरला भेट दिली. ‘एफजीआयआय’ ही जनरल इन्श्युरन्स शाखा असून, रिटेल गेमचेंजर फ्यूचर ग्रुप आणि जागतिक विमा पुरवठादार ‘जनराली’ यांच्यातील संयुक्त भागीदारी आहे.

‘एसओएफओएसएच’तर्फे दुर्बल घटकांमधील कुटुंबातील बालकांना निवारा, निगा, शिक्षण आणि वैद्यकीय साह्य पुरविण्यात येते. ‘एफजीआयआय’चा सीएसआर उपक्रम स्नेह अंतर्गत या बालकांसाठी चिकणमातीचे मॉडेलिंग सेशन आणि काही खेळांचे आयोजन केले होते. त्यात लहान मुलांनी उत्सुकता आणि जिद्दीने सहभाग दर्शवला.  

‘एसओएफओएसएच’ला २० कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून भेट दिली. संस्थेच्या छत्रछायेखाली ५० बालके असून, त्यांनी खेळात सामील होऊन ‘एफजीआयआय’च्या कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधला. चिकणमाती मॉडेलिंग शिबिरामुळे बालकांना त्यांचे गती कौशल्य विकसित करण्याचे प्रोत्साहन मिळाले.

या उपक्रमाविषयी बोलताना ‘एफजीआयआय’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर के. जी. कृष्णमूर्ती राव म्हणाले, ‘एफजीआयआयमध्ये स्वयंसेवा हा एक मार्ग आहे, ज्यामधून आपण आपली समाजाविषयी असलेली बांधिलकी जपतो. याच समाजात आपले ग्राहक आणि सहकारी राहत असतात आणि काम करत असतात. एक कंपनी म्हणून आपले यश हे समाजाची प्रगती करण्यात आपण देत असलेल्या योगदानाशी परस्पर संबंधित असते, असे मत आमच्या कर्मचाऱ्यांनी मांडले.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link