Next
केरळातील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुश्मिता देशमुखला रौप्य
पाच सुवर्णांसह ३२ पदकांची मानकरी; ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेसाठी होणार निवड
BOI
Monday, June 24, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत ठाण्यातील विटाव्यामध्ये राहणाऱ्या सुश्मिता सुनील देशमुखने ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आजवर पाच सुवर्णांसह ३२ पदकांची कमाई करणाऱ्या सुश्मिताची आगामी ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणार आहे. 

१७ जून रोजी केरळमध्ये झालेल्या या ‘ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत सुश्मिताने ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. विशेष म्हणजे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड होणार असल्याचे तिने सांगितले आहे. विविध क्षेत्रात मुलींचा दबदबा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्रही यात मागे नाही. मेरी कोम, गीता-बबिता भगिनी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा यांसारख्या असंख्य मुलींनी आपापल्या क्रीडा प्रकारात आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकविला आहे. 

पॉवरलिफ्टिींगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटाव्यातील एका सामान्य कुटुंबातली सुश्मिता ही आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरांवर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. या स्पर्धांमधून तिने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. दुबईतील ‘आशियाई पॉवरलिफ्टिंग  स्पर्धे’तही तिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सध्या ती गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात एम. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ती कारभारी जिममधून प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक विनायक कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही यशाची शिखरे गाठली आहेत. 

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सुश्मिताने खेळण्याची जिद्द सोडली नाही. तिला विटाव्यातील ‘मराठा समाज संघा’च्या कार्यकर्त्यांनीदेखील आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तर सुधागड तालुक्यातील वाघोशी गाव येथील रहिवासी असल्याने रहिवासी सेवा संघ, ठाणे, मुंबई, पुणे यांनीदेखील उज्वल यशासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search