Next
‘खेळाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक’
प्रेस रिलीज
Tuesday, May 15 | 12:08 PM
15 0 0
Share this story

डॉ. प्रदीप तळवेलकर यांचा सत्कार करताना डावीकडून श्रीधर धुमाळे, राजा मिसाळ, डॉ. तळवेलकर, राकेश गायकवाड व नाजुकराव पाठारे.

पुणे : ‘खेळाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी सातत्याने स्पर्धांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. सातत्यपूर्ण स्पर्धांमधूनच भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू तयार होतील. विविध स्पर्धांच्या माध्यमातून खेळाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार डॉ. तळवेलकर यांना देण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार एएवायएस सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने अकादमीचे सचिव राजा मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ‘एएवायएस’चे खजिनदार श्रीधर धुमाळे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे खजिनदार नाजुकराव पाठारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू राकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link