Next
रणवीरसिंग ‘कॅरेरा’चा ब्रँड अॅम्बेसिडर
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 02:57 PM
15 0 0
Share this story

 मुंबई :  ‘कॅरेरा’ या जागतिक लाईफस्टाईल ब्रँडने आपला ब्रँडअॅम्बेसिडर रणवीरसिंगसह  नव्या  जाहिरात मोहिमेचे सादरीकरण केले आहे. ‘#DRIVEYOURSTORY’ या मोहिमेद्वारे आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ स्पष्ट करण्यात आला आहे. या जाहिरात मोहिमेत रणवीरसिंग याने नवीन सिग्नेचर कलेक्शन वापरले असून यात इटालियन डिझाईन,  शहरी दृष्टिकोनासाठी कलात्मक रचना वापरण्यात आली आहे.  

‘आजवरच्या साठ वर्षांच्या इतिहासात बोल्ड स्टाईलचे कौतुक अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केले आहे. त्यांच्या अत्याधुनिक  मोहिमेचा भाग झाल्याबद्दल मला आनंद होत असून त्यासाठी खूप कष्ट घेण्याची माझी तयारी आहे.  कष्ट असोत वा यश... त्यातून व्यक्तीचे खास व्यक्तिमत्वच समोर येते. तुम्ही या मोहिमेत माझी स्वतःची गोष्ट पाहू शकाल. फिटनेस आणि स्टाईलचा सुंदर मिलाफ साधलेल्या या नवीन स्टाईल्समुळे गर्दीच्या ठिकाणी तुमचे अस्तित्व नक्कीच वेगळे दिसू शकेल.’ असा विश्वास रणवीरसिंगने व्यक्त केला.

याबाबत बोलताना आयएमईए आणि एपीएसी (साफिलो समुह) चे व्यवस्थापकीय संचालक क्यारियाकोस कोफिनास म्हणाले, ‘रणवीर सिंगशी गेले वर्षभर आमची सशक्त भागीदारी सुरू असून, त्याने आमच्या ब्रँडमध्ये त्याचे खास रंग भरले आहेत. रणवीर सिंगसह या वर्षाची सुरुवात नव्या सिग्नेचर कलेक्शनने करताना आम्हाला आनंद होतो आहे. आजच्या तरुणाईच्या मनात घर करणारे कल्पक   कलेक्शन तयार करणे हा आमचा ध्यास आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link