Next
‘हुजपा’मध्ये हिंदी दिन साजरा
नागेश शिंदे
Saturday, September 29, 2018 | 04:54 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आणि हिंदी साहित्य मंडळ व हिंदी विकास कौशल मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. के. कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर महाविद्यालयाचे पदवी तथा पदव्युत्तर हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संतोष विजय येरावार उपस्थित होते. व्यासपीठावर हिंदी विकासप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी भदरगे, प्रा. डॉ. शेख शहेनाज, डॉ. वसंत कदम, डॉ. डोंगरे सर व डॉ. राहुल देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले.

प्रा. डॉ. संतोष येरावार यांनी आपल्या भाषणातून हिंदी साहित्य व हिंदी भाषेतील रोजगार, हिंदी माध्यमातील रोजगाराभिमुखता, हिंदी भाषेची जागतिक स्थिती आदींवर भाष्य केले. ‘राष्ट्रभाषा हीच देशाची मातृभाषा असते. म्हणून सर्व जाती-धर्मांच्या व संस्कृतीच्या लोकांना एका सूत्रात बांधून ठेवून लोकांना संवैधानिक अधिकारांची जाणीव करून देण्याची ताकद फक्त हिंदी भाषेतच आहे. आज हिंदी भाषेचा वापर करणे ही काळाची गरज आहे,’ असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
सूत्रसंचालन शीतल कांबळे या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रा. डॉ. शेख शहेनाज यांनी मानले. या कार्यक्रमासाठी हिंदी विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search