Next
डॉ. उपाध्याय यांनी घेतले दीक्षाभूमीचे दर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, August 08 | 04:31 PM
15 0 0
Share this story



नागपूर : शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर पवित्र दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.  

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे व सदस्य एन. आर. सुटे यांनी आयुक्त डॉ. उपाध्याय यांचे स्वागत करतानाच दीक्षाभूमी स्तूपा मधील डॉ. आंबेडकर व मातोश्री रमाई यांच्या जीवनावरील छायाचित्रांची माहिती दिली.

रक्ताचा एक थेंबही न सांडता जगात सर्वातमाठे धम्म प्रवर्तन नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे झाले. डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशातील कोणतेही शहर धर्मांतरासाठी निवडू शकत होते; मात्र त्यांनी नागपूरच का निवडले, देशातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र हे नागपूर झाले आहे, आदींविषयी राष्ट्रवादीचे नेते आमदार गजभिये यांनी माहिती दिली.

डॉ. उपाध्याय यांनी दीक्षाभूमीला अद्ययावत सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन या वेळी दिले; तसेच दीक्षाभूमी समोरील पुस्तके, बुद्धमूर्ती, आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना नागरिकांना अडथळा होणार अश्याप्रकारे त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली.

या प्रसंगी सहायक पोलिस आयुक्त अशोक शरमबळकर, बजाजनगर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, विजय गजभिये, सिद्धार्थ म्हैसकर, शरद मेश्राम, देवा रंगारी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link