Next
डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम
मिलिंद जाधव
Thursday, January 31, 2019 | 11:58 AM
15 0 0
Share this article:



भिवंडी : तालुक्यातील डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डोंगरपाडा आणि दह्याले शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांचे सादरीकरण केले.

या वेळी समाज एकात्मिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रियांशी कन्स्ट्रक्शनचे उमेश पाटील, काटई गावाच्या माजी सरपंच अलका देवानंद पाटील, काटईचे ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी विकास मंडळाचे अध्यक्ष राम मोरगा, ग्रामपंचायत सदस्य सतीश शिन्गोले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरिता वाजे, उपाध्यक्षा सुशीला दिघे, ऋषिकेश कोठे, विनय मोरे, विजेता विचार फाउंडेशनचे सचिव गणेश पाटील आणि खजिनदार विकास कुचन, सहशिक्षक अशोक गायकवाड, सविता खंदाली, अंगणवाडी कार्यकर्ती बिराजदार, सूर्यवंशी, महिला बचत गट अध्यक्षा सविता राम मोरगा, दिवाणमाळ युवा मित्र मंडळाचे भारत दिघे जयदास मोरगा, शाम मोरगा यांसह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी रघुनाथ कोठे यांच्यातर्फे सर्वांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापक शामकांत नवाले यांनी सूत्रसंचालन केले.



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search