Next
नरेंद्र काळे यांचा जीवनपट मांडणारे ‘आय अॅम’ प्रकाशित
BOI
Monday, January 07, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

‘आय अॅम’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आमदार बालाजी किणीकर, नरेंद्र काळे, ज्येष्ठ अभिनेते व लेखक प्रसाद पंडित व लेखिका अवनी कर्णिक

ठाणे : ‘एक वाया गेलेला मुलगा ते यशस्वी, कर्तबगार उद्योजक अशी वाटचाल करणाऱ्या नरेंद्र काळे यांच्या आयुष्यावरील अवनी कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘आय अॅम’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते व लेखक प्रसाद पंडित आणि आमदार बालाजी किणीकर याच्या हस्ते झाले.  
 
या वेळी बोलताना लेखिका अवनी कर्णिक म्हणाल्या, ‘काही वर्षापूर्वी, एकदा गप्पांच्या ओघात, नरेंद्र काळे यांनी मला ते त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव डायरीत लिहित असल्याचे सांगितले होते. मला त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नंतर  नरेंद्र काळे यांनी ती डायरी मला वाचण्यास दिली. वाचताना त्यांच्या जीवनपटाचा उलगडा झाला. अत्यंत नाट्यमय प्रसंगानी त्यांचे आयुष्य भरलेले आहे. याची जाणीव झाली. पालकांनी घेतलेल्या अचानक निर्णयानुसार इयत्ता सहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, थेट इंग्रजी माध्यमात दाखल झाला. इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. त्यामुळे शाळेत हेटाळणी, उपेक्षा अनुभवायला आली. बालपण करपून टाकणारे हे अनुभव त्या मुलाला बिनधास्त बनवत गेले. खोडकरपणा वाढत गेला. शाळा, कॉलेज बुडवून बाहेर भटकणे, मारामाऱ्या, कॉपी करून पास होणे असे प्रकार घडू लागले. अशीच वाटचाल सुरू असताना, एक वेगळे वळण मिळाले आणि ही उनाड पावले विधायक कार्याकडे वळली. समाजकारण आणि ओघाने काही काळ राजकारणात गेल्यानंतर त्यांनी उद्योगक्षेत्राकडे आपला मोहरा वळवला. व्यवसायात उत्तम यश प्राप्त करून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले. एक वाया गेलेला ‘गोट्या’ समाजात मानाच्या स्थानावर पोहोचला. हा सगळा प्रवास विलक्षण होता. तो जाणून घेतल्यानंतर पुस्तक लिहिण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला नकार देणे शक्यच नव्हते. त्यांनतर काही महिन्यांच्या परिश्रमातून ‘आय अॅम’ हे पुस्तक साकारले. लेखक म्हणून ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.’

‘‘आय अॅम’ हे पुस्तक केवळ नरेंद्र काळे या एकाच व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते सर्वांनाच आपले वाटू शकते. प्रत्येकाला हे पुस्तक स्वत: मधील ‘आय अॅम’ शोधण्यासाठी प्रेरित करेल,’ असेही कर्णिक यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay More About 170 Days ago
मनु पूर्वक अभिनंदन हमें भी एक किताब दे देना
0
0

Select Language
Share Link
 
Search