Next
ट्रेझर आयलँड
BOI
Tuesday, May 08, 2018 | 10:53 AM
15 0 0
Share this article:

कुमारवयीन मुलांसाठी मराठीमधून लेखन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बहुतांश मुले इंग्रजीतील साहित्याकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर विलास फडके यांनी लिहिलेले हे पुस्तक वेगळे ठरावे. नकाशाच्या साह्याने दुर्गम आयलँडवर स्वारी करायला निघालेला नायक जीम हॉकिन्स, धाडसी कॅप्टन अन् त्याच्या सहकाऱ्यांची ही कथा आहे. या वेधक कथेचे रंजकता हे वैशिष्ट्य आहे.

हिस्पॉनिओ हे त्यांचे जहाज. समुद्राच्या लाटा पार करून आयलँडवर पोहोचण्याचा थरारक प्रसंग या कादंबरीतून अनुभवायला मिळतो. कथेच्या ओघात समुद्रावरील जीवन, जहाज, समुद्र आणि माणसाचे नाते, साहस, धाडस अशा अनेक गोष्टींशी परिचय होतो. शत्रूच्या शिबिरात आलेला जखमी जीम, गंभीर जखमा झालेले कॅप्टन स्मॉलेट, कॅप्टन सिल्व्हर यांचे साहस स्तिमित करते.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : २२९
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search