Next
डॉ. वीरेंद्रकुमार खाटिक लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
BOI
Tuesday, June 11, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार वीरेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ११ जून रोजी अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

डॉ. कुमार (६५) यांची खासदारपदाची ही सातवी वेळ असून, ते मध्य प्रदेशातील टिकमगड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. हंगामी अध्यक्ष म्हणून ते १७व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषवतील आणि नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. 

१७व्या लोकसभेचे पहिले सत्र १७ जून ते २६ जुलै या कालावधीत होणार आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून ते लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचेही काम पाहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आधीच्या सरकारमध्ये डॉ. कुमार राज्यमंत्री होते.

डॉ. वीरेंद्रकुमार हे दलित नेते असून, त्यांना वैयक्तिक आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला आहे. तरीही त्यांनी शिक्षण घेतले. शिकत असताना ते सुमारे दहा वर्षे वडिलांच्या पंक्चर काढण्याच्या दुकानातही काम करायचे. सागर जिल्ह्यातील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठातून त्यांनी एमए केले. त्यानंतर बालमजुरी या विषयावर त्यांनी पीएचडी केली. साधी राहणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search