Next
स्वाती कोरी यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड
BOI
Thursday, November 02 | 05:05 PM
15 0 0
Share this story

स्वाती कोरीगडहिंग्लज (कोल्हापूर) : मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘७३ व ७४ वी राज्यघटना दुरूस्ती : विकास आणि भविष्यकालीन दिशानिर्देश’ या राष्ट्रीय परिषदेसाठी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती महेश कोरी यांची निवड झाली आहे.

७३ व ७४ व्या राज्य घटना दुरूस्तीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २ व ३ नोव्हेंबरला ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.  

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पुणे विभागातील पाच जिल्हय़ातून १०जणांची निवड केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातून नगराध्यक्षा कोरी यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लजला विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून शहराचे नाव राज्यभर पोचविले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link