Next
मुंबईत रंगणार ‘पुष्कर शो थ्री’ नाट्यमहोत्सव
पुष्कर श्रोत्रीच्या वाढदिवसानिमित्त विशेष प्रयोगांचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, April 26, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक यशस्वी कारकीर्द असणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचा येत्या ३० एप्रिलला ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्या निमित्ताने, ‘पुष्कर शो थ्री’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पुष्कर श्रोत्री यांच्या सध्या सुरू असलेल्या ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचा महोत्सव विलेपार्लेतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पाच मे २०१९ रोजी होणार आहे. महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे. 

आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्य संपदेला अभिवादन करत पुनरुज्जीवित करणारी ही एक नाट्यकृती असून सकाळी ११ वाजता सादर होणाऱ्या या पहिल्या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ या संस्थेला देण्यात येईल. ट्रॅफिक सिग्नलवर भिक मागणाऱ्या व फुलं, वस्तू विकणाऱ्या लहान मुलांना साक्षर बनविण्याचे कार्य ही संस्था करते. 

बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या दुपारी चार वाजता सादर केले जाणार असून, या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापूरमधील ‘चेतना’ संस्थेला दिले जाईल. गतिमंद आणि विकलांग मुलांना विविध कला शिकवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यात या संथेचे मोठे योगदान आहे. रात्री ८.३० वाजता जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’चा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जेत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी दिले जाणार आहे.

दिवसभर चालणाऱ्या ‘पुष्कर शो थ्री’ या नाट्य महोत्सवातून प्रत्येक संस्थेला जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याचा पुष्कर श्रोत्री यांचा मानस आहे. अभिनेता म्हणून आपण मला आजपर्यंत दाद दिली आहे, या प्रयोगाच्या निमित्ताने मला साथ देऊन प्रयोग हाऊसफुल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search