Next
विराट कोहली उबर इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this story

मुंबई :  शहरी गतीशीलतेची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या उबर रायडिंग अॅपने भारतातील पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची नियुक्ती केली आहे. एशिया पॅसिफिक विभागातील ही पहिलीच नियुक्ती आहे.  

या वेळी  बोलताना उबर इंडिया आणि एसए अध्यक्ष अमित जैन म्हणाले, ‘उबर इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून विराट कोहली यांची निवड व्हावी, याचा आम्हांला अतिशय आनंद आहे. भारताबद्दल त्याची ऑन अँड ऑफ फिल्ड बांधिलकी प्रशंसनीय आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने देशाला जागतिक नावलौकिक प्राप्त करून देण्यापासून ते समाजात वेगळे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याने गुंतवणूक केलेली आहे. देशाला सेवा पुरवण्याची बांधिलकी जपत असताना, दरदिवशी देशभरात आम्ही जी ऊर्जा निर्माण करतो त्याचप्रकारची ऊर्जा असलेले व्यक्तिमत्त्व आम्हला विराट कोहली यांच्या रुपाने गवसले आहे. युथ आयकॉन म्हणून विराट कोहली आपल्या हेतू व सार्वत्रिकतेचे जे प्रतिनिधित्व करतो ते देशाला पुढे नेणाऱ्या आमच्या प्रवासाचा मार्ग आखण्यास मदत करेल.’

विराट कोहली म्हणाला, ‘क्रिकेटपटू म्हणून मी बरेच प्रवास करतो आणि उबर बुक करण्याचा अनुभव मी स्वतः अनुभवतो आहे. लोकांना शहराकडे वळवण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी ही कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करतेय आणि आर्थिक संधी निर्माण करून लाखो लोकांना सक्षम बनते हे पाहणे आनंददायी आहे. जिथे काम करतात त्या शहराशी व लोकांशी बांधिलकी जपणाऱ्या अशा कंपनीशी हात मिळवण्यास मी उत्सुक आहे.’

‘विराट गतिशीलता, एकनिष्ठता, हिंमत, क्षमता याचे प्रतिनिधित्व करतात. जगभरातील नागरिकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि ध्येय यात समतोल साधल्यानेच उबरची भारताप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव असलेला परफेक्ट पार्टनर म्हणून ते योग्य ठरतात. या भागीदारीतून उबर व विराट कोहली हे  येत्या काही वर्षांमध्ये नागरिक व समुदायांचे सशक्तीकरण करण्याच्या समान  दृष्टिकोनातून देशात अब्जावधी डॉलर्सची सेवा पुरवण्याचे उबरचे वचन अधोरेखित करताना दिसतील.’ असे उबर इंडिया अँड साउथ एशियाचे मार्केटिंग हेड संजय गुप्ता यांनी सांगितले. 

‘उबरसाठी भारत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि कंपनी आपल्या उत्पादनामध्ये, लोक व प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक करीत राहणार आहे. उबर भारतात चांगल्या स्थानावर आहे. भारतातला हा सर्वात पसंतीचा राईड हॅलिंग अॅप आहे. २०१८ मध्ये उबर तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करणार आहे,’ असेही गुप्ता यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link