Next
मतदान जनजागृतीसाठी डॉक्टरांचा पुढाकार
‘झेन हॉस्पिटल’मध्ये मतदान जनजागृतीसाठी विशेष अभियान
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 04:33 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातर्फे मदतान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन करत आहेत. 

या मोहिमेस सुरुवात झाली असून, ‘सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा’ (#VoteforHealthynation) हा संदेश प्रिस्क्रीप्शनवर लिहित प्रत्येक घराघरात हा संदेश पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाच महत्त्व विशद करणारे संदेश, डॉक्टरांचे मतदानाविषयी आवाहन करणारे व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, रुग्ण बाह्य विभागात एका बूथच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचारी स्वंयसेवक बनून मतदानाचे महत्त्व नागरिक, रुग्णांना विशद करतील. 

या मोहिमेविषयी बोलताना ‘झेन’चे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, ‘भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. आपला अधिकार बजावून मतदानाचा टक्का वाढविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून, तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडविण्यासाठी, तसेच देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. रुग्णाला जसे औषधोपचार आवश्यक आहे, तसेच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. म्हणूनच लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांना सहभागी करून घेत मतदान करूया आणि सदृढ राष्ट्र घडवू या.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search