Next
पुण्यात योगासन स्पर्धेला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 06:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एस ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च सेंटर, एस हॉस्पिटल, सागर पाटणकर व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगासन स्पर्धा २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. 

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख व ज्येष्ठ योगतज्ज्ञ श्रीकांत देवधर, आरोग्य भारतीचे पश्‍चिम प्रांत प्रमुख डॉ. मुकेश कसबेकर आणि एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर उपस्थित होते. योगासन स्पर्धा आठ ते १२, १२ ते १८, १९ ते २४, २५ ते ४०, ४१ ते ५५ आणि ५५ वरील अशा सहा वयोगटांत झाली. यंदा स्पर्धेत १५० योगसाधकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी परीक्षकांनी योगसाधकांनी केलेल्या सर्व योगासानांचे बारकाईने परीक्षण करून गुणदान केले. 

प्रत्येक वयोगटांतून तीन क्रमांक विजेते घोषित करण्यात आले. प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले; तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. योगा विभागाच्या योगशिक्षिका रिचा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य भारतीचे कार्यकर्ते प्रदीप फासे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search