Next
नाशिक रोडला ‘नगरसेवक आपल्या दारी’ उपक्रम
BOI
Saturday, June 08, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : नाशिक रोडच्या प्रभाग २२मध्ये दर शुक्रवारी ‘नगरसेवक आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, नगरसेवक केशव पोरजे, नगरसेविका सुनिता कोठुळे हे दर शुक्रवारी नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. 

या उपक्रमांर्तगत सात जूनला देवळालीगाव व गांधीधाम परिसराला या नगरसेवकांनी भेट दिली. या वेळी परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज, सांडपाणी आदी समस्या नगरसेवकांपुढे मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका गाडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने काम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 


देवळाली गावात वालदेवी नदीत कमालीची अस्वच्छता असल्यामुळे या नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. नदीत मैला सोडला जात असून, त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. गेल्यावेळी गाडेकर यांनी नदी स्वच्छतेचा उपक्रम राबविला होता. यंदाही पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छता मोहिम राबवावी आणि नदीत मैला व सांडपाणी सोडणे बंद करण्याची अपेक्षा या वेळी नागरिकांनी व्यक्त केली. 

यापुढे दर शुक्रवारी प्रभागात विविध ठिकाणी आपण भेटी देणार असून पूर्ण प्रभाग समस्यामुक्त करणार असल्याचे या वेळी नगरसेविका गाडेकर यांनी सांगितले. या प्रसंगी उत्तम कोठुळे, किरण डहाळे, विकास गिते, कुमार पगारे, योगेश शिंदे, प्रमोद शिंदे, विकी थोरात, स्वप्नील शहाणे आदी उपस्थित होते.

कॅप्शन
देवळाली गाव प्रभाग क्रमांक २२ येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेताना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्यासह मनपा कर्मचारी व कार्यकर्ते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 125 Days ago
Would other councillors follow this example ? They may have to . Good thing too . A regular activity .
0
0

Select Language
Share Link
 
Search