Next
प्र. ल. मयेकर, महावीर जोंधळे
BOI
Wednesday, April 04, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आशयाचं-विषयाचं नावीन्य आणि विलक्षण शब्दकळा ल्यालेल्या दर्जेदार एकांकिका आणि नाटकं लिहून रंगभूमीवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे प्र. ल. मयेकर आणि कवी व बालसाहित्यकार महावीर जोंधळे यांचा चार एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.........  
प्रभाकर लक्ष्मण मयेकर 

चार एप्रिल १९४६ रोजी कोंभेवाडीमध्ये (राजापूर, जि. रत्नागिरी) जन्मलेले प्रभाकर लक्ष्मण मयेकर ऊर्फ ‘प्रल’ हे ८० आणि ९०च्या दशकांतले मराठीचे बिनीचे नाटककार! सुरुवातीला हौशी रंगभूमीसाठी, ‘बेस्ट’साठी आणि इतर स्पर्धांसाठी एकांकिका आणि नाटकं लिहिणाऱ्या ‘प्रलं’ना आधी राज्य नाट्य स्पर्धेतल्या ‘आतंक’मुळे आणि पाठोपाठच्या ‘मा अस् साबरिन’मुळे रंगकर्मींची कमालीची लोकप्रियता लाभली आणि मग - चांगल्या अर्थाने शब्दबंबाळ - नाटकांचा धडाकाच लागला. 

एकीकडे आय कन्फेस, अतिथी, रक्तप्रपात, होस्ट, अब्द शब्द, अतिथी, एक अधुरी गझल, कळसूत्र - यांसारख्या विषयाचं आणि आशयाचं नावीन्य देणाऱ्या दर्जेदार एकांकिका, तर दुसरीकडे ‘अथ मनुस जगन हं’सारखी त्यांची नाटकं भरघोस पारितोषिकं मिळवत होती. पाहतापाहता ‘प्रलं’ची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर येत गेली आणि त्यांच्या नावाचा दबदबा तयार झाला. 

अग्निपंख, अंत अवशिष्ट, अथ मनुस जगन हं, अंदमान, अरण्यदाह, आतंक, आद्यंत इतिहास, आसू आणि हसू, कमलीचं काय झालं, काचघर, गंध निशिगंधाचा, गोडीगुलाबी, तक्षकयाग, दीपस्तंभ, पांडगो इलो रे बा इलो, मा अस साबरीन, मिस्टर नामदेव म्हणे, रण दोघांचे, रमले मी, रातराणी, रानभूल, सवाल अंधाराचा, सोनपंखी, अशा कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशा सर्व प्रकारच्या नाटकांमुळे ‘प्रल’ हे मराठी रंगभूमीसाठी ८० आणि ९०च्या दशकातलं आश्वासक आणि आघाडीचं नाव ठरलं होतं.

राम गणेश गडकरी पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, गोपीनाथ सावकार पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

१८ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.
..........

महावीर जोंधळे
 
चार एप्रिल १९४८ रोजी जन्मलेले महावीर जोंधळे हे कवी, कथाकार, बालसाहित्यकार आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आशयाला अनुसरून अचूक शब्दमेळ हे यांच्या ललित लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

अर्कचित्र, एक पाय तळ्यात, खंड्या आणि कावळा, पावसाचे पाय, साळुंकीची सावली, सरड्याच्या पठारावर, शिवाची वाडी, वारी, अभंग आणिया अनंग, आणखी एक बिरबल, आसवं गाळणारी कासवं, हिरव्या डहाळ्या आणि करवंदी आभाळ, हिरवे ढग, काळा चंद्र, किरणपाणी, लौकिक, नाद अंतरीचा श्रीलंका, साहित्य : आशय आणि आविष्कार, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांच्या ‘मूरलँड्स’ कवितासंग्रहाला राज्यपुरस्कार मिळाला आहे. 

(महावीर जोंधळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link