Next
शिन्झेन किस
BOI
Wednesday, November 14 | 09:59 AM
15 0 0
Share this story

जपानमधील विज्ञानकथा लेखक शिनइची होशी यांच्या कथा या अद्भुत असतात. वेगळे कथानक आणि धक्कादायक शेवट हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य. यातील निवडक कथा निस्सीम बेडेकर यांनी ‘शिन्झेन किस’ या संग्रहातून मराठी वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. यात १८ कथा अगदी छोट्या तीन-चार पाणी आहेत.

कंपन्यांमधील स्पर्धा कशी असते याची झलक दाखवितानाच पैशासाठी गैरवाट पकडली तरी शेवटी योग्य-अयोग्यचा तराजू सत्याच्या बाजूने कसा झुकतो हे ‘कंपनीचे रहस्य’मध्ये दिसते. सिंहाच्या छाव्याचे पालन करण्याची शिक्षा देणारा कल्पक व तितक्याच क्रूर हुकुमशहाला शह देणारा गुप्तहेर ‘सिंहाचा छावा’त भेटतो. याचप्रमाणे मुलांना शिस्त लावणारी संस्था, चांदी व सोन्याचा पत्रा असलेली डिलक्स पण रिकामी तिजोरी, बनावट दारू धंद्यांचे पोल खोलण्यासाठी बारमध्ये आलेल्यांचे अपयश, अशा अनेक वेगवेगळ्या कथा यामध्ये आहेत. शववाहिकेतून गायब झालेला मृतदेह अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर अशा दीर्घकथांचाही यात समावेश आहे.     

प्रकाशन : रोहन प्रकाशन
पृष्ठे : १६८
मूल्य : १९५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link