Next
राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात १२ पुस्तकांचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Saturday, November 24 | 05:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात १२ पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. हे संमेलन पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत आयोजित केले आहे.

संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी ९.३५ वाजता होणार असून, या वेळी संमेलनाध्यक्ष व भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी रंगनाथ नाईकडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, महापौर मुक्ता टिळक, संत अचलस्वामी, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अधिकारी प्रा. राहुल विश्वनाथ कराड, कवयित्री मंदा नाईक, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने, अ‍ॅड. नंदिनी शहासने आदी उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनात ‘निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली, शाकाहार’, ‘वन्यप्राण्यांच्या जगातील गंमती जमती’, ‘माझी लाडकी भारतमाता (कीर्तन)’, ‘विज्ञानाचे नाव चांगदेव पासष्टी’, ‘सलाम मृत्यूंजयाना भाग एक’, ‘सलाम मृत्यंजयाना भाग दोन’, ‘सलाम मृत्यंजयाना भाग तीन’, ‘ओळखा कोण?’, ‘धाडसी गिरीजा’, ‘स्मरणिका’, ‘गाऊ शौर्य गाथा’ आणि ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ या बारा पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. संमेलनास येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींस एक पुस्तक सप्रेम भेट देण्यात येणार असल्याचे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. शहासने यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाला तरुणांसह माजी सैनिक, जवानांचे कुटुंबीय, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस यांसह साहित्यिक, कवी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

संमेलनाविषयी :
दिवस :
रविवार, २५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी आठ ते रात्री आठ
स्थळ : श्री वर्धमान प्रतिष्ठान, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link