Next
मोटो ‘एक्स४’ बाजारात दाखल
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 02:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मोटोरोलाने आपल्या अत्यंत आकर्षक आणि अचूकतेने घडवलेल्या मोटो ‘एक्स४’ या नवीन व्हेरिएंटची घोषणा केली. या फोनमध्ये सहा जीबी रॅम तसेच ६४ जीबीचे अंतर्गत स्टोअरेज आहे.  

नवीन ‘एक्स४’ अधिक स्मार्ट अँड्रॉइड ८.० ओरिओने सुसज्ज असून, हा फोन अधिक वेगवान, अधिक काळ चालणारी बॅटरी, स्प्लिट-स्क्रीन क्षमता, मजकूर निवडीचे स्मार्ट पर्याय, सुधारित नोटिफिकेशन्स, पासवर्ड्ससाठी ऑटोफिल फ्रेमवर्क आणि सर्व अॅप्सचा कमाल उपयोग होईल याची काळजी घेणारे नवीन गुगल प्ले प्रोटेक्ट अशा वैशिष्ट्यांनीयुक्त आहे. यामध्ये ‘मोटो की’ नावाची विशेष सुविधा आहे. या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडत्या पासवर्ड संरक्षित वेबसाइट्स तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून फक्त बोटाच्या स्पर्शाद्वारे बघू शकता.

नवीन ‘एक्स४’मध्ये १२ मेगापिक्सल प्लस आठ मेगापिक्सलचा अधिक दमदार वाइड अँगल ड्युअल रिअर कॅमेरा १२० अंशाच्या व्ह्यूसह आहे. प्राथमिक १२ मेगापिक्सलचा कॅमेरा ड्युअल ऑटोफोकस पिक्सल्ससह असून, त्यामुळे अत्यंत आकर्षक फोटो काढता येतात. आठ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा १२० अंश फिल्ड ऑफ व्ह्यूची सुविधा देतो.

कॅमेराच्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये ‘सिलेक्टिव्ह फोकस’ आणि ‘स्पॉट कलर’ या सुविधांमुळे फोटोंना एक कलात्मक स्पर्श लाभतो तसेच कॅमेरा वापरण्याचा श्रेष्ठ दर्जाचा अनुभवही मिळतो. कॅमेराचे स्मार्ट सॉफ्टवेअर तुम्हाला वस्तू आणि महत्त्वाच्या खुणा ओळखण्यास मदत करते. शिवाय ‘एक्स४’मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह आहे. यामुळे अगदी कमी प्रकाशातही उत्तम सेल्फी काढता येतात. शिवाय यात फेस फिल्टर्स, पॅनोरामिक सेल्फी आणि ब्युटी मोड यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत.

‘एक्स४’चे हे सहा जीबीचे व्हेरिअंट केवळ फ्लिपकार्टवर आणि भारतभरातील मोटो हब्जमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये असून, तो सुपर ब्लॅक आणि स्टर्लिंग ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link