Next
‘विशेष मुलांसाठी पालक, शिक्षक आणि समुपदेशक यांचा सहयोग महत्त्वाचा’
डॉ. नीना राव यांचे मत
BOI
Tuesday, July 30, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

कार्यशाळेत सहभागी झालेल्या पालक, शिक्षकांसह डॉ. नीना राव

पुणे : ‘विशेष गरजा असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि समुपदेशक यांचा सहयोग महत्त्वाचा आहे,’ असे मत मार्गिकाच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीना राव यांनी व्यक्त केले. मार्गिका ही हैद्राबाद स्थित सामाजिक संस्था आहे. 

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या सहकार्याने अध्ययन अक्षमता, मानसिक व विकासात्मक आव्हाने असलेल्या मुलांचे शिक्षक आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यशाळेत साठहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.

डॉ. नीना राव
डॉ. नीना राव पुढे म्हणाल्या, ‘अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणून, जगण्याच्या स्थितीतून समृध्द स्थितीत आणणे गरजेचे आहे. त्याकरिता समग्र दृष्टीकोन आणि पालक-शिक्षक व समुपदेशक यांचा सहयोग त्यांच्या आर्थिक व सर्वांगीण शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा ठरेल. अशा सहकार्यानेच त्यांचे भवितव्य घडेल.’

डॉ. नीना राव या २०१५ पासून या क्षेत्रात काम करत असून, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत शिक्षक, पालक, विशेष शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्यपध्दती व अद्ययावत ज्ञान प्रदान करणे; तसेच याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मार्गिका या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search