Next
पितृत्व ही मोठी जबाबदारी : श्रेयस तळपदे
BOI
Wednesday, January 30, 2019 | 06:51 PM
15 0 0
Share this story


मुंबई : मराठी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीत जास्त रमलेला अभिनेता श्रेयस तळपदे सध्या वैयक्तिक आयुष्यात ‘बाबा’ची भूमिका पार पाडत आहे. आपल्या कामातून वेळ काढत आपल्या चिमुकल्या मुलीला श्रेयस सध्या वेळ देत आहे. तिच्यासाठीच्या आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना पितृत्व ही मोठी जबाबदारी असल्याचे तो म्हणतो.

‘इक्बाल’ फेम श्रेयस तळपदे हा मराठी कलाकार असूनही त्याने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला. ‘गोलमाल थ्री’मधील त्याच्या ‘लक्ष्मण’च्या भूमिकेमुळे तो विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला. सध्या श्रेयसकडे आगामी काही चित्रपटांचे काम असले, तरी तो त्याची एक वर्षाची मुलगी आद्या हिच्यासोबत चांगलाच रमला आहे. 

सध्या आपण मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करत असून, तिच्यासाठी सर्वांत उत्तम जे काही असेल, ते सगळे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने म्हटले आहे. ‘मागच्या वर्षी मुलीचा जन्म झाला आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. एक बाबा म्हणून मी स्वतःला पाहत आहे. या आनंदाबरोबरच ही एक खूप मोठी जबाबदारीही आहे असे मला वाटते. मुलांसाठी आई आणि बाबा या दोघांचीही ही जबाबदारी आहे. त्यानुसार माझ्या व्यग्र कार्यक्रमांतून मी शक्य तेवढा वेळ काढून तिच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझे कामाचे शेड्युल आणि घर या दोघांचाही मेळ साधण्याचा मी प्रयत्न करत आहे,’ असे श्रेयस म्हणाला. 

श्रेयस सध्या ‘माय नेम इज लखन’ नावाच्या एका टीव्ही शोसाठी काम करत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link