Next
सुश्मिताच्या ‘मिस युनिव्हर्स’चा रौप्यमहोत्सव
कुटुंबाने दिले सरप्राइज; पुन्हा घातला मुकुट
BOI
Wednesday, May 29, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this article:

सुष्मिता सेन

मुंबई : १९९४मध्ये भारताच्या वतीने ‘मिस युनिव्हर्स’चा पहिला किताब मिळवणारी अभिनेत्री सुश्मिता सेन हिने नुकतीच या सन्मानाची २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले आहे. या प्रसंगी सुश्मिताच्या कुटुंबाने मोठे सरप्राइज देऊन तिला पुन्हा एकदा मुकुट चढवून हा आनंद साजरा केला. 

२१ मे १९९४ रोजी सुश्मिताने हा किताब जिंकला. ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. त्यामुळे या सन्मानाचे महत्त्व खूप मोठे असल्याचे सुश्मिताने म्हटले आहे. कुटुंबीयांनी या दिवसाच्या आठवणी अविस्मरणीय पद्धतीने साजऱ्या केल्या असल्याचे सुश्मिताने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि मुकुट घातलेला फोटो शेअर केला आहे. 

या फोटोसोबत तिने या सेलिब्रेशनने आपण खूप खुश झाल्याचेही सांगितले आहे. आपल्या देशाविषयी याबद्दल आदर व्यक्त करताना तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘माझ्या आजवरच्या आयुष्याचा प्रवास खूप सुंदर असा आहे. मला इतका मोठा गौरव मिळवून देणाऱ्या माझ्या मातृभूमीला मी खूप धन्यवाद देते. २५ वर्षांपासून मला इथे जे प्रेम आणि आदर-सन्मान मिळाला आहे, ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी कमाई आहे.’

कुटुंबीयांनी साजऱ्या केलेल्या या दिवसाचा एक व्हिडिओही सुश्मिताने पोस्ट केला आहे. त्यात तिची आई प्रीतम शिखरे, तिच्या मुली रैनी आणि अलिशा आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल हे दिसत आहेत. या सर्वांनी आपल्याला खूप मोठे सरप्राइज दिले आहे आणि यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे हा महत्त्वाचा दिवस साजरा केला असल्याचे सुश्मिताने म्हटले आहे. 

१९९४मध्ये मिस युनिव्हर्स बनलेल्या सुश्मिताने १९९६मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘हिंदुस्तान की कसम’, ‘आंखे’, ‘मै हूँ ना’, ‘बीवी नं १’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search