Next
‘हायपरलूप’च्या चाचणी स्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट
प्रेस रिलीज
Tuesday, June 19, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this story

‘वर्जिन हायपरलूप वन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ सदस्य रॉब लॉइड (मध्यभागी) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनेवाडा : कॅनडा, दुबई आणि अमेरिका भेटीचा भाग म्हणून १५ जून २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेतील नेवाडा येथील हायपरलूप वनच्या चाचणी स्थळाला भेट दिली. या भेटीदरम्यान ‘वर्जिन हायपरलूप वन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ सदस्य रॉब लॉइड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. सर रिचर्ड ब्रान्सन यांच्या वर्जिन उद्योग समूहासोबत फेब्रुवारी २०१८मध्ये मुंबई–पुणे हायपरलूप बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकाने एक सामंजस्य करार केला होता. त्यानंतर आजपर्यंत ‘वर्जिन हायपरलूप वन’ने मुंबई–पुणे मार्गाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास पूर्ण केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत फडणवीस यांनी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याच्या कामाला गती देण्याविषयी चर्चा केली. आतापर्यंत हायपरलूपसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने १५ किमीचा पट्टा निश्चित केला आहे. हायपरलूपला लागणाऱ्या एकूण भागांपैकी ७० टक्के महाराष्ट्रातूनच पुरविले जाणार आहेत.

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवास फक्त २५ मिनिटांवर येणार आहे. पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे वरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच हरित गृह वायू उत्सर्जन (Green House Gas emission) कमी होईल. हा प्रकल्प २०२४ पर्यंत कार्यान्वित होण्याची आशा आहे.

सॅन फ्रान्सिस्को येथे बैठक
ओरॅकल, सफ्रा कॅट्झच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससॅन फ्रान्सिस्को येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान ओरॅकल, सफ्रा कॅट्झच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई येथे प्रगत माहिती केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शविली आणि फडणवीस यांना या केंद्रांमध्ये जलदगती गुंतवणूकीस मदत करण्याची विनंती केली. फडणवीस यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरकारतर्फे जरूर ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.

सार्वजनिक हित आणि कल्याण लक्षात घेऊन, दोघांनीही सरकारी माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी संयुक्त गट स्थापन करण्यास सहमती दर्शविली. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ओरॅकल मिळून सरकारसाठी एक सामायिक माहिती प्रणाली निर्माण करतील. ही केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना सगळी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, ह्याचा अर्थ हा, की एकाच प्रकारची माहिती घेण्यास नागरिकांना अनेक विभागांत जाण्याची गरज नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री फडणवीस यांनी आर्थिक तंत्रज्ञानाशी संबंधित धोरणांवर देखील चर्चा केली. ही बैठक ओरॅकलच्या सध्या सुरू असेलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानातील सहकार्याचा भाग होती.

‘सिमॅंटेक’च्या अधिकाऱ्यांशी बैठक
सायबर सुरक्षेसंदर्भात सामंजस्य करारावर सह्या केल्यानंतर सिमॅंटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क, देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरमुख्यमंत्री फडणवीस यांनी सिमॅंटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क यांची सॅन फ्रान्सिस्को येथे भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोघांनी सायबर सुरक्षेसंदर्भात सामंजस्य करारावर सह्या केल्या. या कराराद्वारे, सरकारला सायबर सुरक्षेसाठी एक भक्कम प्रणाली निर्माण करण्यास मदत होईल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link