Next
भारतीय विद्यार्थी देतात गृहपाठ न करण्याची मजेशीर कारणे
प्रेस रिलीज
Saturday, July 20, 2019 | 12:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील जवळपास ४९ टक्के विद्यार्थी गृहपाठ करण्यात आपण कधीना कधी टाळाटाळ करीत असल्याचे, तसेच गृहपाठ न करण्यासाठी ते वेगवेगळी मजेशीर कारणे देत असल्याचे ‘ब्रेनली’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. विद्यार्थी आणि गृहपाठ यांच्यातील कडू-गोड नातेसंबंध जाणून घेण्यासाठी जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन पीयर-टू-पीयर लर्निंग कम्युनिटी असलेल्या ‘ब्रेनली’ने याबाबत नुकतेच सर्वेक्षण केले होते. 

विद्यार्थ्यांना कारणे देण्याची वेळ येते तेव्हा ते ‘गृहपाठ हरवला’ (१८.७ टक्के), ‘वैयक्तिक इजा’ (१४.६), अशा कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’ (चार टक्के), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’ (१३.१), ‘त्याच्यावर शाई सांडली’ (८.२) अशी काही मजेशीर कारणेदेखील देत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचा आढावा घेणाऱ्या या सर्वेक्षणात वेळेवर गृहपाठ न केल्याच्या विद्यार्थ्यांनी पुढे केलेल्या कारणांबाबत जाणून घेण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी ६९.८ टक्के धाडसी विद्यार्थ्यांनी त्यांनी कधीच कारणे दिली नसल्याचे सांगितले, तर जवळपास ३० टक्के विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचे मान्य केले. कारणे देताना, ती यशस्वी व्हावीत यासाठी विद्यार्थी शक्यतो अस्सल आणि पटणारी असे दोन महत्त्वपूर्ण घटक असलेली सबब शोधत असतात. या कारणांमध्ये ‘गृहपाठ हरवला’, ‘डोकेदुखी’ (१४.१), ‘सांगता न येण्याजोगे कुटुंबात उद्भवलेले संकट’ (९.८), ‘वैयक्तिक इजा’(१४.६) या सामान्य कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’ (चार), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’ (१३.१), शाई किंवा कॉफी सांडली’ (८.२), ‘लॅपटॉप क्रॅश झाला’(६.१), ‘दुसऱ्या क्लासच्या वहीत केले’ (४.४%), ‘माझ्या हातातून वाऱ्याने उडून गेले’ (चार), ‘आगीत जळून गेले’ (३.४)’ आदी मजेशीर कारणांचादेखील समावेश होता.

या सर्व मजेशीर प्रतिसादांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटते की त्यांना पुरेशी ऑनलाइन मदत मिळाली, तर ते त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला एक संसाधनात्मक स्थान बनविण्याची तीव्र आवश्यकता असल्याचे सूचित होते.

या विषयी ‘ब्रेनली’चे सहसंस्थापक आणि सीईओ मिशल बोर्कोस्की म्हणाले, ‘अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना गृहपाठाची नेहमीच भीती वाटत राहिली आहे. आम्ही या सर्वेक्षणाद्वारे काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बहुतांशी वेळा गृहपाठाच्या समस्यांमधून बाहेर पडण्यातील असमर्थता हेच या सबबींच्यामागचे कारण असते. पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वीकृती आणि कौतुक मिळाल्यावर गृहपाठ करण्यासाठी सहयोगी वृत्ती दिसून येते.’

‘उत्साही वातावरणात एक पीयर-टू-पीयर दृष्टिकोन असणे ही केवळ गृहपाठ मनोरंजक आणि आकर्षक ठेवण्याची संकल्पना नाही, तर त्याच्यामुळे शिक्षणही अधिक प्रभावी बनते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्रोत आणि सहयोग स्वीकारल्यास, ‘ब्रेनली’सारख्या व्यासपीठामुळे गृहपाठाची कार्यपद्धत कमी कठीण आणि अधिक फलदायी होऊ शकते, अधिक शिकायला मिळते आणि विद्यार्थ्यांना प्रश्नांपासून उत्तरापर्यंतचे मार्गदर्शन मिळते,’ असे बोर्कोस्की यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search