Next
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २२ फेब्रुवारीला
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this story

गडचिरोली : जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्या अध्यक्षतेखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आली. या सभेला डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन २२ फेब्रुवारीला राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात एक ते १४ वयोगटांत  जवळपास ६८ टक्के मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. जंतूंपासून मुलाचे पोषण योग्यरित्या होत नाही. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भूक मंदावणे, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यावर सुज येणे आदी समस्या निर्माण होतात. यासाठी ॲल्बेडेझोल गोळीची मात्रा सेवन करणे गरजेचे आहे.                  

अल्बेडेझोल गोळीची मात्रा दोन वर्षांपर्यंत अर्धी गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षांपर्यंत एक गोळी पावडर करून पाण्यात विरघळून पाजावी तीन ते नऊ वर्षांपर्यंत एक गोळी चावायला द्यावी. एक ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे.

‘जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळांमधील सर्व एक ते १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींना अंगणवाडीसेविका, आशा व शिक्षकांमार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन डॉ. जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link