Next
‘संघर्षातून पुढे आलेल्या महिलाच प्रेरणास्रोत’
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 02:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुरातन काळापासून आपण पाहिले, तर प्रत्येक महिलेने आपापल्या जीवनात संघर्ष केलेला दिसतो. सत्यवती, शूर्पणखा, द्रौपदी, मेनका, सीता यांच्याविषयी आपण वाचतो, ऐकतो; परंतु त्यांचा संघर्ष समजून घेऊन त्यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पात्रांतील महिलांनी केलेल्या संघर्षातून आपण प्रेरणा घेऊन वेगळ्या वाटा निवडायला हव्यात,’ असे मत सुप्रसिद्ध लेखिका कविता काणे यांनी व्यक्त केले.

होप फाउंडेशन आणि नटराजन एज्युकेशन सोसायटीतर्फे (एनईसी) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) येथील मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित ‘आव्हानात्मक वाटा’ या विषयावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुरभी उपाध्याय, ‘आयस्क्वेअरआयटी’ची विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय कराटेपटू शिवानी राजहंसी, ‘एनईसी’चे मुख्य विश्वस्त डॉ. गणेश नटराजन, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी झालेल्या परिसंवादात शेल्टर्स असोसिएट्च्या कार्यकारी संचालिका प्रतिमा जोशी, नॅसकॉम फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक चैत्रा नेरुरकर, औंध लाईटहाउसच्या केंद्रप्रमुख अमृता बहुलेकर आणि हायवेज इन्फनाईटच्या संचालिका डॉ. रितू बियाणी सहभागी झाल्या होत्या. ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या अध्यक्षा डॉ. उमा गणेश यांनी परिसंवादाचे संचालन केले.  

कविता काणेकाणे म्हणाल्या, ‘लेखिका म्हणनू मी प्रत्येकात एक पात्र शोधत असते. म्हणूनच मला स्त्रियांविषयी लिहायला व त्यांचा संघर्ष समजून घ्यायला आवडते. प्रयेक स्त्रीचे पात्र वेगवेगळे असते. स्त्रियांच्या संघर्षांतून मला लिहायला वेगळीच प्रेरणा मिळते. ज्यांनी आलेल्या संकटाना आव्हान समजून संघर्ष केला, त्याच महिला आज आपल्यासमोर आदर्श आहेत. संघर्षातूनच जीवनाला आकार मिळत असतो. त्यामुळे महिलांनी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असायला हवे.’

उपाध्याय म्हणाल्या, ‘आज स्त्रिया पुरुषांच्या पुढे जाऊ शकतात, हे सत्य पुरुषांनी स्वीकारायला हवे, त्यांना पाठिंबा द्यायला हवा. स्त्रिया ठराविक क्षेत्रामध्येच काम करू शकतात, हा दृष्टीकोन बदलायला हवा. गेल्या काही वर्षांत स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य मिळाले आहे; पण ही केवळ सुरुवात आहे.  आपल्याला अजून खूप काही मिळवायचे आहे. त्यामुळे स्त्रियांनी कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता स्वकर्तृत्वाची उत्तुंग झेप घ्यायला हवी. मार्ग शोधलात तर तुम्हाला हमखास पाठिंबा मिळेल.’

परिसंवादात आव्हानात्मक वाटा चालताना आलेले अनुभव, त्यातून मिळालेले यश याविषयी मान्यवरांनी आपली मते मांडली. शिवानी राजहंसी हिने आंतरराष्ट्रीय कराटेपटू होतानाचा प्रवास उलगडला. डॉ. गणेश नटराजन यांनी प्रास्ताविक केले. वैदेही बॅनर्जी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अरुणा कटारा यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link