Next
हृदयातील ८.६ सेंमीची गाठ काढण्यात यश
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वी कामगिरी
प्रेस रिलीज
Thursday, July 25, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या (CVTS) शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने ७४ वर्षीय महिलेच्या हृदयामधील ८.६ सेंमीची गाठ (ट्युमर) यशस्वीरित्या बाहेर काढली. 

शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी या महिलेला अचानक दम लागल्याने व श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभाग दाखल करण्यात आले. लगेच सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या फुफ्फुसांत पाणी भरले होते; तसेच हृदयामधील असणाऱ्या चार कप्प्यामधील एका कप्प्यात गाठ (ट्युमर) असल्याचे दिसून आले; तसेच हृदयाची एक झडप कार्यकरत नव्हती.  हृदयामधील गाठ, बंद पडलेली हृदयाची झडप आणि फुफ्फुसांत पाणी यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. 

रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमने तातडीने मेरॉथॉन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. यात (Heart lung Machine) रुग्णाला हृदयाचे कार्य चालविणाऱ्या मशीनवर ठेवून हृदय पूर्णपणे बंद करून शस्त्रक्रिया करण्यात आली. गाठ बाहेर काढून हृदयाची झडप पुन्हा कार्यरत करण्यात या टीमला यश आले. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास सहा तासांचा अवधी लागला. शस्त्रक्रियेनंतर दोन तासांनी रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवरून (व्हेंटिलेटर) बाहेर काढले. 

या रुग्ण महिलेची तब्बेत स्थिर असून, सध्या त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजित पवार, भूलततज्ज्ञ डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे यांचा सहभाग होता. या महिलेवर केलेली शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी सहा महिन्यांच्या बाळावर अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी २.५ सेंमीची गाठ काढल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग यांनी दिली. ‘या विभागाने आतापर्यंत ४००हून अधिक हृदय संदर्भातील शस्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी ९० टक्के शस्त्रक्रिया या मोफत केल्या आहेत. यात २३ दिवसांच्या बाळापासून ते ८७ वर्षीय वृद्ध रुग्णांचा समावेश आहे.

या यशस्वी कामगिरीबाबत डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाच्या टीमचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी टीमचे कौतुक केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search