Next
लेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव
BOI
Thursday, August 09 | 01:33 PM
15 0 0
Share this storyशिंगवे (नाशिक) :
लेक सासरी जाणे हा कोणत्याही कुटुंबात एकदम हळवेपण आणणारा विषय असतो. आपल्या अंगाखांद्यावर खेळून वाढलेली मुलगी सासरी गेल्यावर घर सुने सुने होते. प्रत्येक गोष्ट, वस्तू यांच्याशी तिच्या आठवणी निगडित असतात. या आठवणी प्रदीर्घ काळ टिकाव्यात म्हणून नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शिंगवे गावाने एक अभिनव उपक्रम राबविला आहे. गावातील लग्न झालेल्या प्रत्येक मुलीच्या नावे झाड लावण्याचा आणि मुलीप्रमाणेच झाडाचा सांभाळ करण्याची नवी परंपरा या गावात मूळ धरते आहे.

गावामधील ज्या लेकींचे लग्न होते, त्या लेकींच्या नावे गावात एक झाड लावले पाहिजे, अशी कल्पना शिंगवे गावचे उपसरपंच धोंडीराम रायते यांनी गावकऱ्यांपुढे मांडली. गावानेही या संकल्पनेला चांगला प्रतिसाद देऊन तिला मूर्त रूप दिले. गेल्या चार महिन्यांत गावातील २६ लेकींचे लग्न झाले आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी लेकीच्या नावे झाड लावण्याची परंपरा सुरू झाली आहे. नव्या नवरीसह तिचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि कुटुंबातील गोतावळा गावातील सार्वजनिक ठिकाणी झाड लावतो. झाड लावल्यावर त्या झाडाला लोखंडी जाळी बसवून त्या जाळीवर ‘लेकीचे झाड’ असे लिहून लेकीचे नावही लिहिले जाते. आजपर्यंत या गावात अशा प्रकारे सुमारे २५ झाडे लावण्यात आली आहेत. झाड लावल्यावर मुलीचे आई-वडील आठवड्यातून दोन-चार वेळा झाडाला पाणी घालतात, आजूबाजूच्या लोकांना झाडाची निगा राखायला सांगतात. सासरी गेलेली लेकही त्या झाडाची चौकशी करते. लेकीचे झाड वाळू नये म्हणून गावातील सर्वच लोक काळजी घेतात.

धोंडीराम रायते‘लेकींच्या झाडांचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी सुरू केला आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण देवासमोर नतमस्तक होतो. तसेच निसर्गासमोरही नतमस्तक झाले पाहिजे. आम्ही गावात लावलेली झाडे लेकींच्या आठवणी जागृत ठेवतील आणि प्राणवायू मुबलक प्रमाणात देतील. या लेकींच्या झाडांच्या माध्यमातून एक नैसर्गिक आणि सांस्कृतिक विचार आम्ही पेरला आहे,’ अशा शब्दांत उपसरपंच धोंडीराम रायते यांनी आपली भूमिका मांडली.

या अनोख्या उपक्रमाची नोंद आता इतर गावांनीही घ्यायला सुरुवात केली आहे. भावनेला कृतीची जोड देऊन पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम राबविला जात आहे. गावातील काही जणांनी सार्वजनिक सहभाग न घेता आपल्या स्वतःच्या अंगणातही लेकीच्या नावे झाडे लावायला सुरुवात केली आहे. नाशिक शहरातही याचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्यांना ही संकल्पना आवडते, ते इतरांना सांगतात आणि सर्वानिक सहभाग न घेता वैयक्तिक पातळीवरही अंमलबजावणी करतात, असे दिसून आले आहे.

माहेरी जा सुवासाची कर बरसात’ 

या कवितेत कवी कृ. ब. निकुंब यांनी सासरी गेलेल्या मुलीच्या मनात येणाऱ्या माहेरच्या आठवणींना अत्यंत तरल शब्दांत शब्दबद्ध केले आहे. माहेरच्या परसदाराबद्दलच्या अनेक आठवणींचा त्यात समावेश आहे. आजच्या आधुनिक काळात गावांचे शहरीकरण होऊ लागल्याने परसदार, तेथील झाडे या संकल्पना हळूहळू लोप पावत चालल्या आहेत; मात्र शिंगवे गावासारखे उपक्रम गावोगावी झाले, तर

‘परसात पारिजातकाचा सडा पडे, 
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे’

असा त्या कवितेची नायिका विचारत असलेला प्रश्न या नव्या युगातील मुलीही वाऱ्याला विचारू शकतील. 

संपर्क : धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे
९६२३२ ९९७७०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अजय सोपानराव जगताप निमगाव शिरडी About 8 Days ago
अतिशय सुदंर उपक्रम आहे आमच्या गावात राबविण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करु
1
0
Sagar gite About 9 Days ago
Aplya gavasarkha itar gavani upkram rabvava
1
0
गणेश दिलीप वाणी About 9 Days ago
मस्त छान उपक्रम आहे.
2
0
श्री निवृत्ती भिकाजी आव्हाड महाजनपूर About 9 Days ago
श्रियुत रायते साहेब उपक्रम फार चांगला आहे मला फार आवडला चांगल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्या
2
0
Harshawardhan borhade About 9 Days ago
छानच
2
0
Rameshwar About 9 Days ago
माझं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव
3
0
शिवरायअनुयायी संतोष बी.फटांगळे About 9 Days ago
हा प्रेरणादायी उपक्रम ग्रामस्थ आणि लोकप्रतीनिधी यांचे मनपुर्वक अभिनंदन
4
0
शामराव गंगाराम नागरे About 9 Days ago
खुप छान उपक्रम सुरू केला असून अशा प्रकारचे उपक्रम हे प्रत्येक गावा गावात सुरू झाले पाहिजे. शिंगवे गावचे उप सरपंच धोंडीराम अप्पा रायते यांचे मनापासून खुप खुप आभार. धन्यवाद
3
0
मच्छिंद्र गिते About 9 Days ago
खूपच छान उपक्रम
3
0
डॉ बापू खालकर About 9 Days ago
स्तुत्य उपक्रम
5
0
लता बाळासाहेब आरोटे About 9 Days ago
मी पण शिंगवे गावांची लेक आहे माझे माहेरचे नाव आहे लता वसंतराव डेरले.उपक्रम खुप छान आहे.
6
0
साईनाथ कोरडे About 9 Days ago
खुप खुप छान
3
0
Maneesha Lele About 9 Days ago
Nice initiative
3
0
sanap Sudhakar About 9 Days ago
Mast
3
0
Kedu Korade About 9 Days ago
"लेकीचे झाड" हि संकल्पना आमचे समाज सेवक धोंडिराम आप्पा रायते उपसंरपच शिंगवे येथे एक नविन संकल्पनेची भर घालून गावाला "स्वच्छ शिंगवे हिरवे शिंगवे" धन्यवाद आप्पा
3
0
Rayate Rahul About 9 Days ago
आमंच गाव........
3
0
Shyamsundar Kavishwar About 9 Days ago
स्तुत्य उपक्रम आहे
3
0
Tanaji bandu derle About 9 Days ago
very good
3
0
दिलीप सोनवणे About 9 Days ago
संुदर गाव स्वच्छ गाव
3
0
Shankar shinde About 9 Days ago
..it's very good project..save a tree and secure your children's future ..and life also..Congratulations
3
0
Shankar shinde About 9 Days ago
..it's very good project..save a tree and secure your children's future ..and life also..Congratulations
4
0
Ramkrishna Derle About 9 Days ago
रक्षावया पर्यावरण करूया वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम अभिनंदन आप्पाजी
6
0
गौतम वामन कटारे About 9 Days ago
आपला। उपक्रम स्तुत्य आहे आपणस शुभेच्छा
5
0
Kiran katare About 9 Days ago
Nice , Abhiman ahe mala gavacha,v sthuty upkramacha
5
0
Sunita b mogal About 9 Days ago
खूप छान उपक्रम
5
0
साहेबराव खंडेराव डेर्ले About 9 Days ago
मस्त माऊली अतिशय छान उपक्रम आहे माऊली आपण सर्व या उपक्रमात सहभागी होऊ ईवलेश रोप लावियले द्वोरी त्याचा वेलु गेला गगनावरी या अभंगाच्या प्रेमाने आपला उपक्रम पुर्ण भारतभर प्रसार करु
5
0
Ravi Ahire (V. D. O. Shingve) About 9 Days ago
अप्पा जी उपक्रमात मी पूर्णपणे सहकार्य करेल. Best of luck
6
0
Rajendra Mogal About 9 Days ago
Best idea for sustainable plantation you've added emotions to it, hats off.
4
0
चंद्रकांत रायते. About 9 Days ago
शिंगव सुंदर गाव
4
0
Dhananjay .B.Derle About 9 Days ago
Good working.such a good planing in future life.appa good working.all the best
5
0
Ganesh b Darade About 9 Days ago
Good idea in our village
5
0
dr derle pralhad About 9 Days ago
Plantation is my hobby since childhood..it's very good project..save a tree and secure your children's future ..and life also..Congratulations D R
6
0

Select Language
Share Link