Next
‘कोमा कॅफे’ची बाजी
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 02:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : अविनाश वासूलिखित आणि दिग्दर्शित ‘कोमा कॅफे’ या चित्रपटाने न्यूयॉर्क येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला.

सत्यदीप मिश्रा, महेश मांजरेकर आणि आदिती वासुदेव या नामवंत कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. यापूर्वी ‘कान्स फेस्टिव्हल’मधील फिल्म मार्केट विभागात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. जर्मनीमधील बर्लीन येथे झालेल्या ‘इंडो जर्मन फिल्म वीक २०१७’मध्येही तो दाखविण्यात आला आला असून, त्यास प्रेक्षक आणि समिक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा समावेश करण्यात आला. ‘कोमा कॅफे’ ही नावीन्यपूर्ण संकल्पनेवर अधारित वेगळ्या धाटणीची कलाकृती असून विव्हान नावाच्या तरूणाची ही कथा आहे.

अविनाश वासू हे पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी नेहमीच नावीन्यपूर्ण आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यावर भर दिला. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी चित्रपट निर्मिती या विषयात सुवर्ण पदक पटकावले आहे. महाविद्यालयीन काळात ‘रूबिक्स क्यूब मीडिया’ नावाची निर्मिती संस्था सुरू करून त्या माध्यमातून ३० पेक्षा अधिक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी सहभाग घेतला.

लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायांकन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप निर्माण केली आहे. त्यानंतर २०१३मध्ये मुंबईत स्थायिक होऊन त्यांनी ‘एरंगो मीडिया’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली. २०१४मधील कान्स महोत्सवात त्यांनी बनविलेल्या ‘युअर डे अॅट कान्स’ या १५ सेंकदांच्या ध्वनीचित्रफितीने पुरस्कार पटकावला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link