Next
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांना अफ्रीन पुरस्कार
BOI
Friday, July 12, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

प्रा. डॉ. सुधाकर जाधवरपुणे : शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून भरीव योगदान दिल्याबद्दल येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांना अफ्रीन फाउंडेशनतर्फे अफ्रीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

अफ्रीन फाउंडेशन ही शैक्षणिक क्षेत्रात देशपातळीवर काम करणारी गुजरातमधील संस्था आहे. नुकताच बडोदा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. डॉ. जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असून, राज्यातील प्राचार्यांच्या हक्क आणि मागण्यांकरता गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राशी संबधित अनेक संस्थांवर ते कार्यरत आहेत. कै. उद्धवराव जाधवर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search